भारतीय वंशाच्या निक्की हेली यांची घोषणा, पाकिस्तानचा ‘हुक्का पानी’ बंद करणार

निम्रता रांधवा म्हणजेच निक्की हेली यांचा जन्म २० जानेवारी १९७२ रोजी झाला. हेली यांचे वडील अजित सिंग रंधावा तर आई राज कौर रंधावा आहे.

भारतीय वंशाच्या निक्की हेली यांची घोषणा, पाकिस्तानचा 'हुक्का पानी' बंद करणार
निक्की हेली
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:51 AM

वॉशिंग्टन : अमेरिकेत 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाच्या निक्की हेली रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार आहेत. निक्कीने 15 फेब्रुवारीपासून आपला निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. आपल्या या प्रचारात निक्की यांनी जगाला वचन दिले आहे. त्यांनी म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष झाली तर चीन आणि पाकिस्तानसारख्या अमेरिकेच्या शत्रूंबद्दल कोणताही दयाळूपणा दाखवणार नाही. अमेरिकेच्या शत्रूंना देण्यात येणारी मदत बंद केली जाईल, असे निक्कीने म्हटले आहे. यावेळी पाकिस्तानला मदत करणाऱ्या जो बायडेन सरकारवरही त्यांनी टीका केली.

पाकिस्तानला येणार अडचणीत

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानसारख्या देशांना एक एक पैशांसाठी मी मजबूर करेल, असे निक्की यांनी निवडणूक प्रचारात म्हटले आहे. निक्की हेली यांच्याशिवाय भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे देखील रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात आहेत. याशिवाय माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील शर्यतीत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली म्हणाल्या, बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला लष्करी मदत पुन्हा सुरू केली आहे आणि अमेरिकन करदात्यांचा पैसा अजूनही कम्युनिस्ट चीनला पैसे देतात, हा मुद्दा त्यांनी प्रचारात घेतला आहे.

ट्रम्प यांच्यांवर केली टीका

अमेरिकेच्या परकीय मदत हाताळण्याच्या पद्धतीबद्दल हेली यांनी जो बायडेन सरकावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने इराक, पाकिस्तान आणि अगदी चीनसारख्या देशांना गेल्या वर्षी 46 अब्ज डॉलर्सची मदत दिली. या प्रकारास फक्त जो बयाडेन नाही तर ट्रम्प देखील जबाबदार आहेत. या दोन्ही सरकारांनी इराक आणि पाकिस्तान आणि ज्या देशांमध्ये दहशतवादी संघटना कार्यरत आहेत, त्यांना मदत केली आहे. म्हणजेच जे अमेरिका विरोधात आहेत, त्यांनी यांनी मदत केली आहे.

कोण आहे निक्की हेली

निम्रता रांधवा म्हणजेच निक्की हेली यांचा जन्म २० जानेवारी १९७२ रोजी झाला. हेली यांचे वडील अजित सिंग रंधावा तर आई राज कौर रंधावा आहे. त्यांनी 1960 च्या दशकात पंजाबमधून कॅनडा आणि नंतर अमेरिकेत स्थलांतर केले. निक्कीचा जन्म अमेरिकेत झाला. निक्की अमेरिकेतील सर्वात तरुण गव्हर्नर होत्या आणि दक्षिण कॅरोलिनाच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून इतिहास रचला. त्या राज्याच्या पहिल्या भारतीय-अमेरिकन गव्हर्नर होत्या आणि त्या पदावर त्यांनी दोन वेळा काम केले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.