भारतीय उच्चायुक्तांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावलं, काय म्हणाले प्रणय वर्मा?
बांगलादेशमध्ये सध्या हिंदू लोकं सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. बांगलादेश सरकार येथील अल्पसंख्यांकांना कोणतीही सुरक्षा पुरवत नाहीये. त्यामुळे मंदिरांवर आणि त्यांच्या घरांवर हल्ले केले जात आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तांना बोलवले होते, पण त्यांना त्यांनाच चांगले सुनावले आहे.
बांगलादेशमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक लोकांवरील होणारे अत्याचार यामुळे भारताने आधीच बांगलादेशला याबाबत योग्य पाऊलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. बांगलादेशमध्ये सध्या परिस्थिती अनियंत्रणात दिसत आहे. असं असताना बांगलादेशने मंगळवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले. प्रणय वर्मा यांना ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. बांगलादेशातील वृत्तपत्र ‘द डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्मा यांनी कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध ‘फक्त एका मुद्द्यापुरते मर्यादित असू शकत नाही असं वर्मा म्हणाले. ‘आमच्यात व्यापक आणि बहुआयामी संबंध आहेत. भारताला परस्पर फायद्यासाठी दोन्ही देशांमधील ‘अवलंबित्व’ वाढवायचे आहे.
परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हटले की, ‘त्यांना (वर्मा) बोलावण्यात आले आहे. भारतीय उच्चायुक्त दुपारी 4 वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. बीएसएसने सांगितले की, कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांनी भारतीय उच्चायुक्तांना बोलावले आहे.
बांगलादेशातील भारताचे माजी उच्चायुक्त पिनाक रंजन चक्रवर्ती यांनी म्हटले की, बांगलादेशमधील परिस्थिती गंभीर आहे., कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. अंतरिम सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की, हे ‘गैर-राजकीय’ सरकार आहे. चक्रवर्ती म्हणाले, ‘मला वाटते की भारत सरकारने वेट अँड वॉचची रणनीती अवलंबली आहे. कारण आपल्या प्रतिक्रिया तेथे भारतविरोधी शक्तींना जन्म देऊ शकतात.
भारताचे माजी उच्चायुक्त म्हणाले की, ‘भारताने स्थिती सामान्य राखण्याचा प्रयत्न केलाय. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिसावर निर्बंध लादलेत. इमर्जन्सी व्हिसा अजूनही दिला जात आहे. वैद्यकीय व्हिसाही दिला जात आहे. मात्र, भारतात येणाऱ्या बांगलादेशींची संख्या कमी झाली आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर अल्पसंख्याकांशी भेदभाव केल्याचा आरोप आहे. सरकार अल्पसंख्याकांची घरे आणि धार्मिक स्थळ यांना पुरेशी सुरक्षा देत नाहीयेत. इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले आहे. कृष्णा दास एका रॅलीत सहभागी होण्यासाठी चितगावला जात असताना त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आणि तुरुंगात त्यांची रवानगी केली होती.