हमासचे समर्थन, मोदींचा उडवला होता मजाक, भारतीय नागरिकास अमेरिकेत अटक
सुरी यांच्या सोशल मीडिया पोस्टचा तपास अमेरिकन पोलिसांनी केला. त्यात त्यांनी गाझावर इस्त्रायल हल्ले आणि भारताने इस्त्रायलला दिलेला पाठिंबा याचा निषेध केला होता. 6 जून 2024 रोजी एका पोस्टमध्ये सुरी यांनी मोदी सरकारचा मजाक उडवला होता. त्यात इस्त्रायलला भारताने क्षेपणास्त्र दिल्याचेही म्हटले होते.

अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठातील संशोधक बादर खान सुरी यांना हमासचे समर्थन करणे महागात पडले आहे. सुरी यांनी नरेंद्र मोदी सरकारचाही मजाक उडवला होता. अमेरिकन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आता त्यांना देशाबाहेर हाकलण्याची तयारी सुरु केली आहे. सुरी यांची पत्नी मफाज सालेह एक पॅलस्टानी नागरिक आहे. त्यांचे वडील अहमद यूसुफ हे हमासचे एक वरिष्ठ राजकीय सल्लागार आहे. अमेरिकेने हमासला दहशतवादी संघटना जाहीर केले आहे.
सुरी यांना अमेरिकन कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हमासचा प्रचार करणे आणि सोशल मीडियावर एन्टी-सेमिटिजम वाढवण्याचा आरोप आहे. हमासच्या सल्लागारासोबत त्यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप आहे. जॉर्जटाउन विद्यापीठाने म्हटले आहे की, सुरी यांच्या अवैध हालचालीसंदर्भात आम्हाला कोणतीच माहिती नाही. तसेच आम्हाला त्यांना अटक का केली आहे? त्याचे कारणही सांगितले नाही.
मोदी सरकारचा उडवला मजाक
सुरी यांचे वकील हसन अहमद यांनी म्हटले की, आमच्या सरकारने आणखी एका निर्दोष व्यक्तीचे अपहरण करुन त्यांना कारागृहात टाकले आहे. एखादा तज्ज्ञ व्यक्ती आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या समस्यावर लक्ष केंद्रीत करत असले तर सरकार त्याला विद्रोही समजत आहे. हा सरकारचा मोठा दोष आहे, असे त्यांनी म्हटले.
सुरी यांच्या सोशल मीडिया पोस्टचा तपास अमेरिकन पोलिसांनी केला. त्यात त्यांनी गाझावर इस्त्रायल हल्ले आणि भारताने इस्त्रायलला दिलेला पाठिंबा याचा निषेध केला होता. 6 जून 2024 रोजी एका पोस्टमध्ये सुरी यांनी मोदी सरकारचा मजाक उडवला होता. त्यात इस्त्रायलला भारताने क्षेपणास्त्र दिल्याचेही म्हटले होते.
असे झाले लग्न…
सुरी आणि मफाज सालेह यांची भेट 2011 मध्ये गाझामध्ये झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर मफाज यांनी दिल्लीत येऊन जामिया मिलिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 2020 मध्ये बादर खान सुरी यांची पीएचडी झाल्यावर ते अमेरिकेत गेले. त्या ठिकाणी जॉर्जटाउन विद्यापीठातील अलवलीद सेंटर फॉर मुस्लिम-ख्रिश्चियन अंडरस्टँडिंगमध्ये पीस अँड कॉंफ्लिक्ट स्टडीज पोस्टडॉक्टरल फैलो म्हणून रुजू झाले.