भारताने पाकिस्तानी जहाज समुद्री डाकूपासून सोडवले, 19 पाकिस्तानी नाविकांची सुटका
पाकिस्तानी मासेमारांचे हे जहाज होते. त्यात 19 पाकिस्तानी नाविक होते. भारतीय नौदलाने 36 तासांच्या आता या सर्वांची सुटका केली. भारताच्या आयएनएस सुमित्रा युद्धानौकेद्वारे हे अभियान चालवले गेले. मागील 24 तासांत भारतीय नौदलाने 19 पाकिस्तानी आणि 17 ईराणी नागरिकांना समुद्र लुटारुपासून वाचवले.
नवी दिल्ली, दि.30 जानेवारी 2024 | भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला मदत केली आहे. शत्रूत्व विसरुन भारताने पाकिस्तानला ही मदत केली आहे. सोमालिया डाकूंनी पाकिस्तानी जहाजाचे अपहरण केले होते. पाकिस्तानी मासेमारांचे हे जहाज होते. त्यात 19 पाकिस्तानी नाविक होते. भारतीय नौदलाने 36 तासांच्या आता या सर्वांची सुटका केली. भारताच्या आयएनएस सुमित्रा (INS Sumitra) युद्धानौकेद्वारे हे अभियान चालवले गेले. तसेच नौदलाने सोमालियाजवळ असणारे एक मासे पकडण्याचे जहाज ‘अल नईमी (Al Naeemi)’ आणि त्यावरील लोकांनाही वाचवले.
पाकिस्तानी नाविकांची सुटका
पाकिस्तानच्या अपहरण झालेल्या जहाजात 19 पाकिस्तानी नाविक होते. सोमवारी रात्री सोमलिया डाकूंनी या सर्वांचे अपहरण केले होते. भारतीय नौदलास यासंदर्भातील माहिती मिळताच ऑपरेशन सुरु करण्यात आले. सर्व पाकिस्तानी नाविकांची सुटका केली. मागील 24 तासांत भारतीय नौदलाने 19 पाकिस्तानी आणि 17 ईराणी नागरिकांना समुद्र लुटारुपासून वाचवले.
इराणी मासेमारी जहाज सोडवले
इराणी मासेमारी करणाऱ्या जहाज अल नईमीवर सशस्त्र समुद्र डाकू होते. त्यांनी सर्व इराणी मासेमारांना बंधक बनवले होते. भारताच्या आयएनएस सुमित्रा युद्धनोकेने त्या इराणी जहाजाला थांबवले. त्यानंतर समुद्री डाकूंना सर्व जणांना सोडून देण्यास भाग पाडले. आयएनएस सुमित्रा हे जहाज भारतीय तटरक्षक दलाचे आहे. समुद्री डाकूंपासून इतर जहाजांना सुरक्षा देण्याचे कामगिरी या जहाजावर सोपवण्यात आली आहे. कोचीनपासून 800 मैल लांब असणाऱ्या जहाजांना आयएनएस सुमित्राने वाचवले.
बंडखोरांकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य
लाल समुद्र आणि अरबी समुद्राच्या परिसरात चाच्यांची दहशत पाहायला मिळत आहे. येथे व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन हल्ले केले जात आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धानंतर लाल समुद्रात इराण येमेनच्या हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे अनेक व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. यामुळे भारतीय आयएनएस सुमित्राने या भागात मोर्चा सांभाळला आहे. त्याला चांगले यश आले आहे.