भारतीय वंशाचे उद्योगपती विवेक रामास्वामी यांना ट्रम्प सरकारमध्ये मोठी जबाबदारी
इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी युएस पॉलिटिक्स अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या नेत्रदीपक विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प मोठ्या पदांवर नियुक्ती करण्यात व्यस्त आहेत. ट्रम्प यांनी इलॉन मस्क आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. याआधी ट्रम्प आपली टीम तयार करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला प्रमुख एलोन मस्क आणि उद्योजक-राजकारणी विवेक रामास्वामी यांना अनेक मोठ्या पदांवर नियुक्त केल्यानंतर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की मस्क आणि रामास्वामी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी (DoGE) चे नेतृत्व करतील. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिलीये.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले – “मला हे कळविण्यात आनंद होत आहे की, अमेरिकन देशभक्त विवेक रामास्वामी यांच्यासह महान इलॉन मस्क, ‘सेव्ह अमेरिका मूव्हमेंट’साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सरकारी कार्यक्षमतेचा विभाग सांभाळतील. या दोन अद्भुत व्यक्ती माझ्या प्रशासनात नोकरशाही दूर करण्यासाठी, फालतू खर्च कमी करण्यासाठी, अनावश्यक नियम काढून टाकण्यासाठी आणि फेडरल एजन्सींमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्य करतील. यातून पैशांची उधळपट्टी करणाऱ्या लोकांना स्पष्ट संदेश जाईल.
ट्रम्प यांनी पुढे लिहिले की, ‘हा आमच्या काळातील मॅनहॅटन प्रकल्प देखील बनू शकतो, कारण रिपब्लिकन नेत्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेच्या विभागाची उद्दिष्टे पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले आहे.’
We will not go gently, @elonmusk. 🇺🇸 https://t.co/sbVka2vTiW
— Vivek Ramaswamy (@VivekGRamaswamy) November 13, 2024
यूएस मंत्रिमंडळात त्यांच्या समावेशास प्रतिसाद देताना, एलोन मस्क यांनी लिहिले की, ‘सरकारी कार्यक्षमतेचा विभाग. तर विवेक रामास्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आणि लिहिले – एलोन मस्क, आम्ही हे हलक्यात घेणार नाही.
कोण आहेत रामास्वामी?
भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे एक श्रीमंत बायोटेक क्षेत्रातील मोठे उद्योजक आहेत. रामास्वामी यांना कोणत्याही प्रकारचा सरकारी अनुभव नाही, परंतु त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले आहे आणि त्यांनी खर्च कमी करण्यावर भर दिला आहे.