Parag Agarwal | ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल, जॅक डोरसी यांचा राजीनामा

प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला संधी देण्यात आलीय. जॅक डोरसी यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिल्यानंतर आता पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्त करण्यात आलंय.

Parag Agarwal | ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल, जॅक डोरसी यांचा राजीनामा
PARAG AGARWAL
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 11:54 PM

मुंबई : प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला संधी देण्यात आलीय. जॅक डोरसी यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिल्यानंतर आता पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्त करण्यात आलंय. तशी अधिकृत घोषणा करण्यात आली असून माजी सीईओ जॅक डोरसी यांनी अग्रवाल यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे अग्रवाल यांचं शिक्षण मुंबई आयआयटीमधून झालेलं आहे.

अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये कार्यरत

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या मुख्य कार्यकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. तर जॅक डोरसी हे 2022 पर्यंत कंपनीच्या बोर्डावर कायम असतील. अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2011 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत विशेष सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये काम पाहिलेलं आहे. त्यानंतर 2017 मध्ये अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच सीटीओ म्हणून काम पाहिले. याआधी त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्ये काम केलेलं आहे. विशेष म्हणजे अग्रवाल यांनी त्यांचं बिटेकचं शिक्षण आयआयटी मुंबईमधून पूर्ण केलेलं आहे. कॉम्यूटर सायन्स अँड इंजिनिअररिंगमध्ये ते निष्णात आहेत.

जॅक डोरसी यांचा राजीनामा, म्हणाले मला परागवर विश्वास

जॅक डोरसी यांच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनले आहेत. तर डोरसी यांनी आपल्या राजीनाम्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मला पारगवर पूर्ण विश्वास आहे. त्याची मागील दहा वर्षातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यातील कौशल्य आणि प्रतिभेचा माझ्यावर कायमच प्रभाव राहिलेला आहे, असे मत व्यक्त केलेय.

विश्वास ठेवला त्यामुळे आभार

दरम्यान, सीईओ पदावर नियुक्ती झाल्यानंतर पराग यांनी जॅक डोरसी यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच जॅक आणि मी चांगले मित्र आहोत. अजूनही आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जॅकचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खरच जॅक यांचे आभार मानतो असे पराग यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या :

Mamta banerjee : उद्या ममता बॅनर्जी मुंबईत दाखल होणार, शरद पवार यांची घेणार भेट

प्रयागराज हत्याकांड: एकतर्फी प्रेमातून चौघांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा

Omicron : ओमिक्रोन जोरदार वेगानं हातपाय पसरतोय, आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनचा प्रसार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.