देशाला हादरुन टाकणारे फोटो काढणाऱ्या भारतीय फोटोग्राफरची अफगाणिस्तानमध्ये हत्या, तालिबानच्या हल्ल्यात अखेरचा श्वास
विशेष म्हणजे एकाच स्मशानभूमीत किती प्रेतं जळतायत त्याचा टॉप अँगलवाला प्रसिद्ध फोटोही दानिश सिद्दीकी यांनीच काढलेला आहे. त्यांचा एक एक फोटो हा एक हजार शब्दांच्या बातमीवरही भारी पडावा.
भारतीय आणि विशेषत: माध्यमांना हादरुन टाकणारी घटना अफगाणिस्तानमध्ये घडलीय. भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमधल्या कंदहार भागात हत्या करण्यात आलीय. ते सध्या रॉयटर्स ह्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या न्यूज संस्थेसोबत काम करत होते. अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेताच तालिबान्यांनी हिंसा करायला सुरुवात केलीय. ते कव्हर करण्यासाठी दानिश सिद्दीकी हे अफगाणिस्तानमध्ये होते. एक मिशन कव्हर करत असतानाच दानिश यांची हत्या केली गेलीय.
नेमकी घटना कशी घडलीय? मिळालेल्या माहितीनुसार दानिश सिद्दीकी यांची हत्या स्पीन बोल्डक (Spin Boldak area) भागात करण्यात आलीय. हा भाग कंदहार प्रांतात येतो. गेल्या काही काळापासून ह्याच भागात तालिबानी आणि अफगाण फोर्सेस यांच्यात तुंबळ लढाई सुरु आहे. ते कव्हर करण्यासाठीच दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये होते. आणि त्यातल्याच घटना कव्हर करताना दानिश यांना संपवण्यात आलंय.
THREAD. Afghan Special Forces, the elite fighters are on various frontlines across the country. I tagged along with these young men for some missions. Here is what happened in Kandahar today while they were on a rescue mission after spending the whole night on a combat mission. pic.twitter.com/HMTbOOtDqN
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
टीव्ही रिपोर्टर ते फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांनी स्वत:च्या करिअरची सुरुवात टीव्ही न्यूज चॅनलचे रिपोर्टर म्हणून केली पण नंतर त्यांनी स्वत:चं पॅशन फॉलो करत फोटो जर्नलिस्ट झाले. 2018 साली दानिश सिद्दीकींना जगप्रसिद्ध अशा पुलित्झर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. त्यांचे सहकारी अदनान आबिदींचाही सन्मान करण्यात आला. रोहींग्या शरणार्थींचं संकट दानिश सिद्दीकींनी मोठ्या प्रमाणात कव्हर केलं. त्यासाठी त्यांना वाहवाही मिळाली.
The Humvee in which I was travelling with other special forces was also targeted by at least 3 RPG rounds and other weapons. I was lucky to be safe and capture the visual of one of the rockets hitting the armour plate overhead. pic.twitter.com/wipJmmtupp
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
अफगाणिस्तानमध्ये जेव्हा डोक्यावरुन रॉकेट गेलं दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या सर्व घडामोडींची माहिती स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन देत होते. 13 जुलैला रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी केलेलं ट्विट हे त्यांचं शेवटचं ट्विट ठरलंय. ह्या ट्विटमध्येही त्यांनी कंदहारमध्ये नेमकं काय घडतं आहे याची सविस्तर माहिती दिलीय. तो संपूर्ण थ्रेड वाचण्यासारखा आहे. 13 जुलैलाच अफगाण-तालिबान लढाई कव्हर करताना सिद्दीकी हे अफगाण फोर्सेसच्या गाडीत होते. त्या गाडीवर तालिबान्यांनी रॉकेटनं हल्ला केला.(याचा व्हीडीओ ट्विटमध्ये आहे तो पहावा) त्यावर सिद्दीकी म्हणतात-माझं नशिब चांगलं की मी सुरक्षित आहे. एका रॉकेटला मी आमच्या आर्मर प्लेटवरुन जाताना पाहिलं.
Got a 15 minute break during almost 15 hours of back to back missions. pic.twitter.com/Y33vJYIUlr
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
कोरोनाची वेदना फोटोतून आपल्या देशात कोरोनानं जे मृत्यूचं तांडव केलं, त्यालाही दानिश सिद्दींकींनी फोटोंच्या माध्यमातून देशातच नाही तर जगभर पोहोचवलं. लोक कसे वेदनेत आहेत, प्रशासन कसं अपूरं पडतंय, आणि विशेष म्हणजे एकाच स्मशानभूमीत किती प्रेतं जळतायत त्याचा टॉप अँगलवाला प्रसिद्ध फोटोही दानिश सिद्दीकी यांनीच काढलेला आहे. त्यांचा एक एक फोटो हा एक हजार शब्दांच्या बातमीवरही भारी पडावा. हे सगळे फोटो लोकांच्या एवढे डोळ्यासमोर आहेत की, दानिश सिद्दीकींचं काम इतिहासात नोंदवलं जाईल.
As India posted world record of COVID cases funeral pyres of people, who died due to the coronavirus disease were pictured at a crematorium ground in New Delhi, April 22, 2021. @Reuters #CovidIndia pic.twitter.com/bm5Qx5SEOm
— Danish Siddiqui (@dansiddiqui) April 22, 2021
विदेशी सैनिकांची घरवापसी आणि तालिबान्यांचा धूडगुस जेव्हा अफगाण फोर्सेस आणि तालिबान्यांमध्ये तुंबळ युद्ध सुरु होतं, त्याच वेळेस दानिश सिद्दींकींचा मृत्यू झालाय. (Taliban afghanistan fight)अजूनही तालिबानी आणि अफगाण फोर्सेसमधलं युद्ध सुरुच आहे. 20 वर्षानंतर परदेशी सैनिक हे अफगाणिस्तानमधून माघारी जातायत. तोच तालिबान्यांना विजय वाटतोय. परदेशी सैनिक ज्या ज्या भागातून निघून जातायत तो तो भाग काबिज करण्याचा तालिबानी प्रयत्न करतायत. अफगाणिस्तानच्या 85 टक्के भागावर कब्जा केल्याचा दावा तालिबानी करतायत.