भारताशी वैर घेणं मालदीवला पडले महागात, भारतीयांनी असा दिला झटका

Indian tourist in maldive : मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे सध्या भारताविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेत आहे. चीन दौऱ्यावरुन आल्यानंतर ते अधिक आक्रमकता दाखवत आहे. पण असं असलं तरी त्यांना आता भारतीयांना चांगलाच धक्का दिला आहे. भारत विरोधी भूमिका त्यांना महागात पडणार आहे.

भारताशी वैर घेणं मालदीवला पडले महागात, भारतीयांनी असा दिला झटका
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 4:12 PM

India maldive row : भारतीयांशी वैर घेणाऱ्या मालदीवला आता हे महागात पडले आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ते चीन समर्थक असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे भारत विरोधी भूमिका घेत आहेत. २०१९ मध्ये भारतासोबत केलेला करार देखील या सरकारने रद्द केला आहे. इतकंच नाही तर मालदीवमध्ये असलेली भारतीय सैनिकांची उपस्थिती देखील त्यांना खुपत आहे. म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांना माघारी बोलवण्याची मागणी भारताकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला येण्याचं आवाहन केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यावर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. ज्यामुळे त्यांची पदावरुन हकालपट्टी देखील करण्यात आली होती. या घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष चीन दौरा करुन आल्यानंतर त्यांची भारत विरोधी भूमिका आणखी आक्रमक झाली आहे. भारताने देखील मालदीवला झटका देण्याची तयारी केली आहे.

भारतीयांची मालदीवकडे पाठ

शेजारील श्रीलंकेने गेल्या महिन्यात परदेशी पर्यटकांच्या बाबतीत मालदीवला मागे टाकले आहे. मालदीवमधील समुद्रकिनारे जगभरातील पर्यटकांची पहिली पसंती राहिले आहेत, मात्र आता श्रीलंकेने 4 वर्षांनंतर प्रथमच मालदीवला मागे टाकले आहे. श्रीलंकेत सर्वाधिक पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. भारतीयांना आता मालदीव ऐवजी श्रीलंकेला जाण्यास पंसती दिली आहे. याआधी मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वात जास्त असायची पण आता भारतीय पर्यटक 5 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

मालदीवच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात भारतीय पर्यटक मालदीव ऐवजी श्रीलंकेकडे वळले आहेत. जानेवारीत मालदीवमध्ये १,९२,३८५ पर्यटक आले होते, तर श्रीलंकेत २,०८,२५३ पर्यटक आले होते. श्रीलंकेच्या पर्यटन आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये श्रीलंकेत भारतीय पर्यटकांची संख्या १३,७५९ वरून ३४,३९९ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 17,029 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते, तर या वर्षी जानेवारीमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या 15,006 होती.

श्रीलंका बनला भारतीयांची पसंती

जानेवारी महिन्यात भारत ही श्रीलंकेसाठी सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ होती. जानेवारीमध्ये भारतातून 34,399, रशियातून 31,159, ब्रिटनमधून 16,665, जर्मनीतून 13,593 आणि चीनमधून 11,511 पर्यटक श्रीलंकेत आले. तर मालदीवच्या पर्यटन बाजारपेठेच्या बाबतीत जानेवारीत रशिया प्रथम, चीन दुसऱ्या, इटली तिसरा, ब्रिटन चौथा आणि भारत पाचव्या स्थानावर आहे. जानेवारी महिन्यातच भारत आणि मालदीवमध्ये लक्षद्वीप आणि पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद वक्तव्यावरून वाद झाला होता. गेल्या वर्षी एकूण 14,87,303 पर्यटक श्रीलंकेत आले होते. तर मालदीवमधील पर्यटकांची एकूण संख्या १८,७८,५४३ होती.

अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही भारतीय पर्यटकांना श्रीलंकेला भेट देण्याचे आवाहन केले होते. भारतीयांनी सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची जोरदार मोहीम सुरू केली होती. भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे मालदीवला मोठा फटका बसला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.