AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यानंतर शेकडो भारतीय पाकिस्तानातून आले, शीख कुटुंबांचा रोखला प्रवेश, म्हणाले की दुबईत…!

भारत आणि पाकिस्तानचे संबंध पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर कमालीचे ताणले गेले आहेत. त्यानंतर आता परस्परांच्या नागरिकांची त्यांच्या - त्यांच्या देशात पाठवणूक केली जात आहे. भारतीय वंशाच्या काही शीख कुटुंबांना मात्र वाघा बॉर्डरवरुन भारतात प्रवेश नाकारला आहे

पहलगाम हल्ल्यानंतर शेकडो भारतीय पाकिस्तानातून आले, शीख कुटुंबांचा रोखला प्रवेश, म्हणाले की दुबईत...!
Follow us
| Updated on: Apr 27, 2025 | 3:02 PM

पहलगाम हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. भारताने आता पाकिस्तानबरोबर स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत. सिंधू नदीचे पाणी वाटप करार रद्द केला आहे. पाकिस्तानी व्हीसा रद्द केला आहे. तर पाकिस्तानातील भारतीयांना आता ते लोक परत पाठवत आहेत. परंतू त्यातही पाकिस्तान आता आपली हेकनी कायम ठेवली आहे. तेथील भारतीयांना बॉर्डरवरुन क्रॉस करताना अनेक चित्र अटी पाकिस्तानने घातल्या आहेत.

पाकिस्तानात आता 450 हून अधिक भारतीय नागरिक गेल्या तीन दिवसात वाघा बॉर्डरवरुन भारतात मायदेशी परतले आहेत. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थिती आणि व्हीसा रद्द झाल्यानंतर भारतीयांना आता आपल्या देशात परतणे भाग पडले आहे. शनिवारी तर २३ भारतात परत आले आहेत. हे पाकिस्तान सुपर लीग ( PSL ) 2025 शी संबंधित कर्मचारी होते. शनिवारी तर सीमा पार करणाऱ्या भारतीयांची एकूण संख्या अजून कळलेली नाही.

अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ लोकांचा मृत्यू

गेल्या तीन दिवसात सुमारे १०० भारतीय लोक मायदेशी परतले आहे. शुक्रवारी तर ३०० भारतीय नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात आले आहेत. शनिवारी २३ हून अधिक भारतीय आपल्या देशात परत आले आहेत.याच दरम्यान २०० पाकिस्तानी नागरीक देखील भारतातून पाकिस्तानात परतले आहेतत. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपर्यंत अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातून बहुतांश पर्यटक आहेत. केंद्र सरकारने या हल्ल्याचा कट सीमापार पाकिस्तानात शिजल्याचे समजल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे सल्लागाराला निलंबित केले आहे. सिंधु पाणी वाटप करार रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर अटारी – वाघा बॉर्डर चौकी  तडकाफडकी बंद केली आहे.

हे सुद्धा वाचा

शीख कुटुंबांना मात्र प्रवेश नाकारला

भारतीय वंशाच्या काही शीख कुटुंबांना मात्र वाघा बॉर्डरवरुन भारतात प्रवेश नाकारण्यात आला आहे. लोहार पासून सुमारे ८० किलोमीटर दूर ननकाना साहीब येथे राहाणाऱ्या भारतीय मूळ असलेल्या कॅनेडीयन शीख कुटुंबांना मात्र प्रवेश नाकारला आहे. त्यांना दुबईच्या मार्गे विमान प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी १०५ भारतीय आणि २८ पाकिस्तानी नारिकांना त्यांच्या-त्यांच्या देशात जाण्याची परवानगी दिली आहे.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.