Breaking : श्रीविजय एअर फ्लाइट 182 चा संपर्क तुटला, उड्डाण घेताच हवेमध्ये गायब

या विमानाने इंडोनेशियाची (Aviation Officials) राजधानी जकार्ता इथून उड्डान घेतल्यानंतर लगेचच एव्हिएशन अधिकाऱ्यांशी संपर्क तुटला.

Breaking : श्रीविजय एअर फ्लाइट 182 चा संपर्क तुटला, उड्डाण घेताच हवेमध्ये गायब
Big announcement from DGCA
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 6:34 PM

जकार्ता (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या (Indonesia) परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीविजय एअर फ्लाइट 182 हिचा शनिवारी उड्डाणानंतर संपर्क तुटला आहे. या विमानाने इंडोनेशियाची (Aviation Officials) राजधानी जकार्ता इथून उड्डान घेतल्यानंतर लगेचच एव्हिएशन अधिकाऱ्यांशी संपर्क तुटला. विमानाने शनिवारी दुपारी सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केलं. FlightRadar24 मधील आकडेवारीनुसार, हे विमान बोईंग 737-500 सीरिजमधलं होतं. (Indonesia news air flight 182 lost contact after taking off from jakarta)

मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, जकार्ता ते पोंटिअनक (बोर्निया बेट) इथं श्रीविजय विमानाचा संपर्क तुटला आहे. ते म्हणाले की, विमानाशी दुपारी 2:40 वाजता अखेरचा संपर्क साधण्यात आला होता.

यासंबंधी माहिती देताना इंडोनेशियन एअरलाइन्सनं सांगितलं की, बोईंग 737-500 मध्ये किती प्रवासी आणि चालक दल होते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर कोणतीही माहिती हाती येण्याआधी प्रतिक्रिया देणं योग्य नाही असं म्हणज श्रीविजय एअर यांनी काहीही उघड केलं नाही.

फ्लाइटरडार 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीविजय एयर #SJ182 ने जकार्ताहून सुटल्यानंतर 4 मिनिटांनी 10,000 फूट उंचीवर असताना एका मिनिटापेक्षाही कमी वेळात संपर्क तुटला. फ्लाइटरडार 24 ने ट्वीट करून त्याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, विमान शोधण्यासाटी सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत विमानाचं नेमकं लोकेशन समजू शकलेलं नाही.

खरंतर, विमान सुरक्षेला घेऊन आधीच वाद पेटला आहे. अशात आता या घटनेमुळे आणखी गोंधळ उडाला आहे. यामुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आहे. तर विमानाच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याची गतीही कमी होते. यामुळेही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. (Indonesia news air flight 182 lost contact after taking off from jakarta)

संबंधित बातम्या – 

ट्रम्पचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी?; राष्ट्रपती असतानाच फरार होण्याचा प्रयत्न?

दोन भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी काऊंसिलमध्ये समावेश, बायडन यांची घोषणा

(Indonesia news air flight 182 lost contact after taking off from jakarta)

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.