Dengue: नवीन डासांनी डेंग्यूच्या डासांशी लढा; इंडोनेशियातील संशोधकांचा प्रयोग यशस्वी
नवीन डासांच्या प्रजातीच्या मदतीने डेंग्यूच्या रोगाशी लढाण्याचा मार्ग संशोधकांनी शोधला आहे. निर्माण केलेल्या (mosquitoes after breeding) नविन डासांमध्ये एक प्रकारचे जीवाणू असेल, जो डेंग्यू सारख्या विषाणूना त्यांच्या आत वाढण्यापासून रोखतो आणि डेंग्यूच्या रोगाचा प्रसार कमी होतो.
इंडोनेशियातील संशोधकांनी डेंग्यूशी लढण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. नवीन डासांच्या प्रजातीच्या मदतीने डेंग्यूच्या रोगाशी लढाण्याचा मार्ग संशोधकांनी शोधला आहे. निर्माण केलेल्या (mosquitoes after breeding) नविन डासांमध्ये एक प्रकारचे जीवाणू असेल, जो डेंग्यू सारख्या विषाणूना त्यांच्या आत वाढण्यापासून रोखतो आणि डेंग्यूच्या रोगाचा प्रसार कमी होतो. महत्तवाचं म्हणजे याच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. (Indonesia scientists find new way to fight dengue by mosquito breeding)
“तत्त्वतः आम्ही ‘चांगल्या’ (good mosquitoes) डासांना जन्म देत आहोत. डेंग्यू वाहक डास वोल्बॅचिया (Wolbachia) वाहक डासांशी घेतील वीण होतील. ज्यामुळे वोल्बॅचिया डास – ‘चांगले’ डास निर्माण होतील. त्यामुळे हे डास लोकांना चावले तरी त्याचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही,” असं वर्लड मोस्कीटो प्रोग्राम (WMP) ने दिली.
यशस्वी चाचणी
वोल्बॅचिया हा एक सामान्य विषाणू आहे जो 60% कीटकांच्या प्रजातींमध्ये नैसर्गिकरित्या असतो. पण डेंग्यूच्या डासांमध्ये हा विषाणू नस्तो. 2017 पासून संशोधकांनी चाचणीसाठी योग्याकार्टा शहरात डेंग्यू तापाच्या ‘रेड झोन’ मध्ये तयार केलेले डास सोडले आहेत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनने जूनमध्ये या चाचणीच्या प्रकाशीत निकालांमध्ये असे दिसून आले की, वोल्बॅचिया वाहक डासांमुळे 77% डेंग्यूचे रूग्ण कमी झाले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रूग्ण 86% पर्यंत कमी झाले.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, अलिकडच्या दशकात जागतिक डेंग्यूचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे आणि जगातील निम्म्या लोकसंख्येला आता धोका आहे. दरवर्षी अंदाजे 100-400 दशलक्ष डेंग्यूच्या रूग्णंची नोंद होते. WHO ने म्हटले आहे की, साथीच्या रोगाचा आणि डेंग्यूच्या साथीचा एकत्रित परिणामाचा धोका जास्त लोकसंख्या असलेल्या भागात आसतो. डासांसाठीजे फॉगिंग (fogging) केले जाते ते केवळ डासांना मारून टाकते, ब्रीडिंग त्याने संपत नाही.
Other News
Dengue Outcry in India:डेंग्यूच्या साथीचा उत्तर भारतात हाहाकार, कोणते राज्य प्रभावित?
Russia Covid Update: रूसमध्ये मृत्यूंची विक्रमी वाढ; सप्टेंबरमध्ये 44,265 मृत्यू, World War II नंतर सर्वाधिक
(Indonesia scientists find new way to fight dengue by mosquito breeding)