तुर्कीत महागाईचा भडका; मुदतपूर्व निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी, नागरिकही सरकारच्या धोरणांवर नाराज

तुर्कीमध्ये महागाई उच्चस्थरावर पोहोचली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबरडे मोडले असून, अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. देशात वाढत असलेली महागाई सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. तुर्कीचे चलन असलेल्या 'लीरा'च्या  मुल्यामध्ये देखील मोठ्याप्रमाणात घट झाली आहे.

तुर्कीत महागाईचा भडका; मुदतपूर्व निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी, नागरिकही सरकारच्या धोरणांवर नाराज
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 6:15 AM

अंकारा : तुर्कीमध्ये महागाई उच्चस्थरावर पोहोचली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबरडे मोडले असून, अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. देशात वाढत असलेली महागाई सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. तुर्कीचे चलन असलेल्या ‘लीरा’च्या  मुल्यामध्ये देखील मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. डॉलरच्या तुलनेत लीराचे मुल्य 50 टक्क्यांनी घटले आहे. चलनामध्ये झालेली घसरण हे दर वाढीचे एक प्रमुख कारण आहे. दरम्यान सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश महागाईच्या खाईत लोटला गेल्याचा आरोप तेथील अर्थतज्ज्ञांनी केला आहे. वाढत्या महागाईला तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब्ब हेच जबाबदार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

भाजीपाल्याच्या किमतीमध्ये दररोज वाढ 

तुर्कीमध्ये महागाई उच्चस्थरावर पोहोचली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब्ब  यांच्या अडचणी वाढल्याा आहेत. वाढत्या महागाईचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. देशात महागाई इतकी वाढली आहे की, फळ, भाजीपाला विक्रेत्यांना दररोज  आपल्या मालाच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. साधा भाजीपाला खरीदी करणे देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे जनता तैयब्ब यांच्यावर नाराज असून, टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

मतदान केल्याचा पश्चताप

तुर्कीचे नागरिक असलेल्या यिलमाज छोरू या 76 वर्षांच्या वृद्धाने एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले आहे की, माझ्या उभ्या आयुष्यात मी असे सरकार पाहिले नव्हते. जेव्हा देशात लष्करी राटवट लागू  करण्यात आली होती, तेव्हा देखील आमचे इतके हाल झाले नाहीत. देशात महागाईचा भडका उडाला आहे, अन्नधान्य खरेदी करणे देखील नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याला तुर्की सरकारची नितीची जबाबदार असून, राष्ट्रपतींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मी तैयब्ब यांना राष्ट्रपतीपदी निवडूण  देण्यासाठी मतदान केले होते. मात्र आता मला माझ्या निर्णयाचा पश्चताप होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतात देखील महागाई वाढली

दरम्यान दुसरीकडे भारतामध्ये देखील महागाईचा भडका उडाला आहे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. खाद्य तेलाच्या किमती देखील वाढल्या आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये व्यवसायिक सिलिंडर तब्बल  पाचशे रुपयांनी महागले आहे. त्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर देखील वाढले आहेत. विविध वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

तळतळाट लागला? ज्या CEO ने 900 लोकांना एका झटक्यात नोकरीवरुन काढलं आता तोही सक्तीच्या सुट्टीवर !

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या या आठवड्यातील भाव

Nashik Gold: सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार; आगामी आठवड्यातही भाव स्थिर राहण्याची शक्यता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.