INTERNET DOWN: जगभरात इंटरनेट ठप्प, अमेझॉनसह दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट बंद

जगभरात इंटरनेट ठप्प झाल्यानं मोठ मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्याचं समोर आलंय. एका महत्त्वाच्या इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर सर्विस प्रोव्हायडरमुळे इंटरनेट ठप्प झाल्याचं बोललं जातंय.

INTERNET DOWN: जगभरात इंटरनेट ठप्प, अमेझॉनसह दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट बंद
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 5:31 PM

वॉशिंग्टन : जगभरात इंटरनेट ठप्प झाल्यानं मोठ मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्याचं समोर आलंय. वेबसाईट्स क्रॅश होणाऱ्यांमध्ये Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk द गार्जियन, न्यूयॉर्क टाईम्स, बीबीसी, फायनान्शियल टाईम्स अशा अनेक लोकप्रिय वेबसाईट्सचा समावेश आहे. एका महत्त्वाच्या इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर सर्विस प्रोव्हायडरमुळे इंटरनेट ठप्प झाल्याचं बोललं जातंय (Internet down worldwide problem in opening of many websites showing error 503).

जागतिक माध्यमसंस्था न्यूयॉर्क टाईम्स आणि ब्रिटन सरकारची वेबसाईट देखील क्रॅश झालीय. या वेबसाईट्स लोडच होत नाहीयेत. त्यामुळे वापरकर्त्यांना सातत्याने वेबसाईटवर इरर दिसत आहे. क्लाऊड कम्प्यूटिंग कंपनी Fastly मुळे ही अडचण आल्याचं सांगितलं जातंय. ही कंपनी वेबसाईट्सला सर्व्हिस देते. वेबसाईटवर क्लिक केल्यावर तेथे एरर कोड 503 दिसतो आहे.

कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क (CNN) इंटरनेटच्या मुलभूत रचनेचा महत्त्वाचा भाग आहे. ही कंपनी वेब सेवांच्या सर्व्हरचं जागतिक नेटवर्क चालवते. याबाबत Tech Crunch ने फायनान्शियल टाईम्सच्या एका कर्मचाऱ्याचा आधार घेत इंटरनेटमधील हा बिघाड CDN (कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क) प्रोव्हायडर Fastly मुळे झाल्याचं म्हटलंय.

CDN काय आहे?

सीडीएन प्रॉक्सी सर्व्हरच्या रूपात काम करते. तुम्ही जेव्हा एखादी वेबसाईट उघडता तेव्हा वेबसाईटवरील माहिती तुम्हाला पाहण्यासाठी ही माहिती एका सीडीएन सर्व्हरवर साठवली जाते. जेणेकरुन वापरकर्त्यांना प्रत्येकवेळी वेब पेज लोड करताना मुख्य सर्व्हरवर जावे लागू नये.

या वेबसाईट्स बंद

जगभरात अनेक वेबसाईट्स ठप्प झाल्या आहेत. यात Stackoverflow, रेडिट, ट्विट्च, गिटहब, कोरा, अमेझॉन वेब सर्विस, शोपिफाई, ट्विटर, अमेझॉन, Vimeo, गुगल, Spotify, गुगल ड्राईव्ह, मेगा, एअरटेल, पेपाल, युट्यूब, स्पीडटेस्ट, फ्रीफायर, इंस्टाग्राम, वोडाफोन, गुगल मीट, जिओ, गुगल मॅप्स, एक्सायटेल, बीएसएनएल, व्हॉट्सअॅप, लाईन, Hulu, जीमेल, नेटफ्लिक्स, अॅक्ट, आयडिया, स्टीम, इत्यादी…

हेही वाचा :

5G Testing | मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स

5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह ‘या’ बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

दुप्पट पैसे घ्या पण वेगवान इंटरनेट द्या! 5G वापरण्यासाठी भारतीय उत्सुक

व्हिडीओ पाहा :

Internet down worldwide problem in opening of many websites showing error 503

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.