INTERNET DOWN : 1 तासानंतर ठप्प झालेलं इंटरनेट जगभरात पुन्हा सुरू, वाचा बंद होण्याचं कारण

जगभरातील इंटरनेट 1 तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरळीत झालं.

INTERNET DOWN : 1 तासानंतर ठप्प झालेलं इंटरनेट जगभरात पुन्हा सुरू, वाचा बंद होण्याचं कारण
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 11:26 PM

वॉशिंग्टन : जगभरातील इंटरनेट ठप्प झाल्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर Internet Down आणि Internet Outage असे हॅशटॅगही ट्रेंड झाले. या इंटरनेटच्या तांत्रिक दोषामुळे Amazon, Reddit आणि Twitch सह अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्सलाही फटका बसला. इतकंच नाही तर ब्रिटची सरकारी वेबसाईटसह फायनान्शियल टाईम्स, द गार्डियन आणि न्यूयॉर्क टाईम्सची वेबसाईट देखील बंद पडली होती (Internet restore after 1 hour of websites crash in world).

दुपारी साडेतीन ते साडेचार या दरम्यान हा इंटरनेट बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. इंटरनेट ठप्प होण्यामागे क्लाउड कंप्युटिंग प्रोव्हायडर कंपनी फास्टली (Fastly) जबाबदार असल्याचं उघड झालंय. कंपनीने देखील याबाबत कबुली दिलीय. फास्टलीने म्हटलं आहे, “आमच्या ग्लोबल कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कमध्ये (सीडीएन) एक अपडेशन करत असताना काही तांत्रिक बिघाड झाला होता.” BBC ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक तास इंटरनेट सेवा ठप्प होती. त्यानंतर जगभरातील वेबसाईट्स पुन्हा सुरुळीत होऊ शकल्या.

ग्लोबल नेटवर्कमधील ऑनलाईन बिघाड दूर

Fastly ने म्हटलं, “आम्हाला एका सर्विस कॉन्फिगरेशनची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर आमच्या पीओपीमध्ये (पॉइंट्स ऑफ प्रीजेंस) अडथळे आले होते. पीओपी माहिती जागतिक पातळीवर वितरित सर्व्हर्सला पाठवायला परवानगी देतो. हे सर्व्हर शेवटच्या वापरकर्त्यांपासून जवळ असतं. आता जागतिक नेटवर्क पुन्हा सुरळीत झालं आहे.”

CDN काय आहे?

सीडीएन प्रॉक्सी सर्व्हरच्या रूपात काम करते. तुम्ही जेव्हा एखादी वेबसाईट उघडता तेव्हा वेबसाईटवरील माहिती तुम्हाला पाहण्यासाठी ही माहिती एका सीडीएन सर्व्हरवर साठवली जाते. जेणेकरुन वापरकर्त्यांना प्रत्येकवेळी वेब पेज लोड करताना मुख्य सर्व्हरवर जावे लागू नये.

या वेबसाईट्स बंद

जगभरात या काळात अनेक वेबसाईट्स ठप्प झाल्या होत्या. यात Stackoverflow, रेडिट, ट्विट्च, गिटहब, कोरा, अमेझॉन वेब सर्विस, शोपिफाई, ट्विटर, अमेझॉन, Vimeo, गुगल, Spotify, गुगल ड्राईव्ह, मेगा, एअरटेल, पेपाल, युट्यूब, स्पीडटेस्ट, फ्रीफायर, इंस्टाग्राम, वोडाफोन, गुगल मीट, जिओ, गुगल मॅप्स, एक्सायटेल, बीएसएनएल, व्हॉट्सअॅप, लाईन, Hulu, जीमेल, नेटफ्लिक्स, अॅक्ट, आयडिया, स्टीम, इत्यादींचा समावेश होता.

हेही वाचा :

INTERNET DOWN: जगभरात इंटरनेट ठप्प, अमेझॉनसह दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट बंद

5G Testing | मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स

5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह ‘या’ बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

व्हिडीओ पाहा :

Internet restore after 1 hour of websites crash in world

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.