इराणच्या नौदलाची इस्रायलच्या जहाजावर मोठी कारवाई, 17 भारतीय अडकले

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाची परिस्थिती आहे. इराणकडून इस्रायलवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायलने याबाबत पाऊल उचलले आहे. पण इस्रायलवर थेट हल्ला करण्याऐवजी इराणी इतर मार्गातून त्यांना जखम देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे.

इराणच्या नौदलाची इस्रायलच्या जहाजावर मोठी कारवाई, 17 भारतीय अडकले
israel iran war
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 6:24 PM

Israel-Iran Conflict : इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी इस्रायलशी संबंध असलेलं भारतात येणारे जहाज ताब्यात घेतले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने हे कमांडो जहाजावर उतरले. त्यानंतर त्यांनी जहाज ताब्यात घेतलं. जहाज ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या जहाजावर पोर्तुगालचा ध्वज आहे. लंडनस्थित कंपनी झोडियाक मेरिटाइमशी हे जहाज संबंधित आहे. Zodiac Group हा इस्रायली अब्जाधीश Eyal Ofer यांच्या मालकीचा आहे. पण या जहाजात असलेले चालक दल भारतीय असून त्यांची संख्या सुमारे १७ असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेवटचे दुबईत दिसले जहाज

Zodiac Group ने या संपूर्ण घटनेवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. MSC Aris हे जहाज शुक्रवारी दुबईच्या किनाऱ्याजवळ शेवटचे पाहिले गेले होते. त्यानंतर ते दिसले नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जहाजाने त्याचा ट्रॅकिंग डेटा बंद केला होता, कारण इस्त्रायली जहाजांसाठी जे या परिसरातून जातात त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. इराणी लष्कराचे कमांडो या जहाजावर उतरले आहेत.

भारताच्या मुंबई बंदरात येत होते जहाज

एक कमांडो इतर कमांडोना कव्हर देत होते. हेलिकॉप्टरचा वापर करत हे कमांडो जहाजावर उतरले. इराणच्या निमलष्करी दल रिव्होल्युशनरी गार्डकडून या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे, ज्यांनी यापूर्वीही जहाजांवर हल्ले केले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धसदृश परिस्थिती असताना इराणच्या नौदलाने ही कारवाई केली आहे. इराणच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या भागात मोठ्या प्रमाणावर युद्धनौका तैनात केल्या आहेत. अमेरिकेने इस्रायलला मदत केल्यास त्यालाही लक्ष्य केले जाईल, असे इराणने म्हटले आहे.

इराणकडून इस्रायलवर येत्या २४ तासात हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने देखील याबाबत इस्रायलला अलर्ट दिला आहे. यासोबतच इस्रायलच्या मदतीसाठी २ युद्धनौका देखील तैनात केल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.