Iran attack in pakistan | इराणचा पाकिस्तानवर मोठा हल्ला, एअर स्ट्राइकने हादरवलं, किती नुकसान झालं?

Iran attack in pakistan | जगात आधीच दोन युद्ध सुरु आहेत. आता युद्धाची तिसरी आघाडी उघडली जाण्याची दाट शक्यता आहे. इराणने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केलाय. इराणने पाकिस्तानवर हल्ला का केला? या एअर स्ट्राइकमागे काय कारण आहे?

Iran attack in pakistan | इराणचा पाकिस्तानवर मोठा हल्ला, एअर स्ट्राइकने हादरवलं, किती नुकसान झालं?
Iran attack in pakistan
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 9:32 AM

Iran Air strike in Pakistan | सध्या जगात दोन आघाड्यांवर भीषण युद्ध सुरु आहे. जागतिक युद्धाचा धोका कायम आहे. या दरम्यान इराणच्या एका कृतीने टेन्शन वाढवलय. इराणने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. इराणने मिसाइल आणि ड्रोनद्वारे हल्ला करुन जैश अल अदलच्या ठिकाणांना टार्गेट केलय. इराणच्या हल्ल्याने मोठ नुकसान झालय. पाकिस्तान भडकला असून त्यांनी इराणला धमकी दिली आहे.

इराणने एअर स्पेसच उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात निंदा केली आहे. एकतर्फी कारवाई हे चांगले शेजारी असल्याच लक्षण नाही. अनेक मिसाइलने हल्ला झाल्याच जैश अल अदलने म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या अधिकाऱ्यांना हजर होण्यास सांगितलं आहे.

किती जणांचा मृत्यू?

इराणच्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानात मोठ नुकसान झालय. या हल्ल्यात 2 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झालेत, असा पाकिस्तानने दावा केलाय. मृतांचा आकडा वाढू शकतो. त्याशिवाय दोन घर उद्धवस्त झाली आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर नुकसानीचा व्हिडिओ समोर आलाय. यात अनेक रहिवाशी इमारतींचा आता ढिगारा उरल्याच दिसत आहे. हा व्हिडिओ जैश अल अदलने जारी केलाय. पंजगुरच्या कौह सब्ज भागात इराणने हा हल्ला केलाय. जैश अल अदल या दहशतवादी संघटनेचा हा मजबूत तळ मानला जात होता, तिथे इराणने हल्ला केलाय. इथे मोठ्या संख्येने जैश अल अदलचे दहशतवादी लपले होते. तिथून ते दहशतवादी कारवाया करत होते.

अखेर इराणने एअर स्ट्राइक का केला?

इराणने जैश अल अदलने केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. डिसेंबरमध्ये जैश अल अदलने इराणमध्ये मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या 11 पोलिसांचा मृत्यू झाला होता. जैश अल अदलच्या हल्ल्यात इराणच मोठ नुकसान झालं होतं. जैश अल अदलचे दहशतवादी इराणला लागून असलेल्या सीमेवर सतत हल्ला करत असतात.

कोण आहे जैश अल अदल?

जैश अल अदल ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे. 2012 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. जैश अल अदलचे दहशतवादी पाकिस्तान-इराण बॉर्डरवर दहशतवादी कारवाया करत असतात. इराणच्या आतमध्ये सतत त्यांचे हल्ले सुरु असतात. अनेकदा इराणी बॉर्डर पोलिसांची या दहशतवाद्यांनी किडनॅपिंग केली आहे.

पाक पंतप्रधानांना समजलं सुद्धा नाही 

इराणने पाकिस्तानवर हल्ला केला, त्यावेळी पाकिस्तानच्या केयर टेकर प्राइम मिनिस्टरची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक सुरु होती. इराणने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केलाय, याचा पाकिस्तानी पंतप्रधानांना पत्ताही लागला नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.