Iran Attack on Israel : इतकं सांगूनही इराणने मोठी चूक केली, आता घनघोर युद्धाची सुरुवात का?
Iran Attack on Israel : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आधीच इराणला बजावलं होतं. पण इराणने ती चूक केली आहे. आता परिणाम कसे होतील? त्या बद्दल कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. इस्रायलने हिज्बुल्लाहच्या रुपाने आपण दहा ते बारा दिवसात काय करु शकतो, ते जगाला दाखवून दिलय. इस्रायल पूर्ण तयारी आणि विचारानिशी युद्धाच्या मैदानात आहे.
अखेर ज्या गोष्टीची शक्यता होती, तेच घडलय. दोन मोठ्या देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इस्रायल आधीच गाजा पट्टी आणि लेबनान या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. आता इराण विरुद्ध मोर्चा उघडला जाऊ शकतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला आधीच इशारा दिला होता. पण इराणने ती चूक केलीय असा इस्रायलचा दावा आहे. इस्रायलवर मिसाइल हल्ला झाला आहे. ही मिसाइल्स इराणमधून आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलने जेरुसलेममधील नागरिकांना शेल्टरमध्ये आश्रय घेण्याच आवाहन केलं आहे. मध्य इस्रायलमध्ये सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. इराणने मिसाइल हल्ला केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. संपूर्ण देशभरात सायरने वाजू लागले आहेत. इराणकडून हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने आधीच वर्तवली होती.
इराणमधून रॉकेट हल्ला होत असून सर्व नागरिकांना बॉम्बपासून संरक्षण देणाऱ्या शेल्टरमध्ये आश्रय घेण्यास सांगण्यात आलं आहे. प्राण वाचवणाऱ्या मार्गदर्शक सूचना आधीच इस्रायलकडून आपल्या नागरिकांना करण्यात आल्या आहेत. इराणने हल्ला केला, तर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी इस्रायलने आधीच दिली होती. इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. इराणकडून 102 बॅलेस्टिक मिसाइल्स डागण्यात आल्याचा दावा इस्रायली फोर्सने केला आहे. मध्ये आणि दक्षिण इस्रायलमध्ये नागरिकांना बंकरमध्ये राहण्यास सांगितलं आहे. इस्रायलच्या आयरन डोमने इराणच्या मिसाइल्सचा सामना सुरु केला आहे.
हल्ला रोखण्यासाठी इस्रायल काय करतय?
हिजबुल्लाह चीफ नसरल्लाहच्या मृत्यूनंतर इस्रायलवर मोठा हल्ला होणार अशी आधीपासूनच शक्यता वर्तवण्यात येत होती. इराणकडून बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला होण्याआधीच इस्रायली फोर्सने शंका व्यक्त केली होती. इराणकडून मिसाइल लॉन्च होताच इस्रायलने आपलं सुरक्षा कवच आयरन डोम एक्टिव केलं आहे. सध्या इस्रायलचा सर्व भर इराणकडून येणारे मिसाइल्स रोखण्यावर आहे. टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्ट्नुसार आयरन डोमने इराणी मिसाइल पाडण्यास सुरुवात केली आहे. “आमचं आयरन डोम एक्टिव आहे. आम्ही प्रत्येक धमकी आणि हल्ल्याचा सामना करण्यास तयार आहोत” असं इस्रायली लष्कराने प्रवक्ते डॅनियल हंगारी यांनी म्हटलं आहे.
इस्रायलमध्ये अंदाधुंद गोळीबार
मंगळवारी जाफा स्टेशनपासून इस्रायलवरील हल्ल्याची सुरुवात झाली. दोन दहशतवाद्यांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या फायरिंगमध्ये चौघांचा मृत्यू झाला. इस्रायली सुरक्षा यंत्रणा या हल्लेखोरांचा सामना करत असतानाच इराणकडून मोठा बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला झाला.