Iran attack on Pakistan | इराणी सैन्याचा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक, मोठ्या कमांडरचा खात्मा

Iran attack on Pakistan | इराण आणि पाकिस्तानात पुन्हा एकदा तणाव वाढणार आहे. इराणने थेट पाकिस्तानता घुसून सर्जिकल स्ट्राइक केलाय. या हल्ल्यात मोठा कमांडर ठार झालाय. अलीकडेच दोन्ही देशांनी परस्परांवर हवाई हल्ले केले होते.

Iran attack on Pakistan | इराणी सैन्याचा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक, मोठ्या कमांडरचा खात्मा
Iran attack on PakistanImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 9:15 AM

Iran attack on Pakistan | इराणने पुन्हा एकदा पाकिस्तानात घुसून स्ट्राइक केला आहे. इराणच्या सैन्याने जैश-अल-अदलच्या ठिकाणांवर हल्ला केलाय. दहशतवादी संघटनेचा कमांडर इस्माइल शाहबख्श आणि त्याच्या काही साथीदारांना संपवलं. इराणच्या सरकारी मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली. इराणी सैन्याने शुक्रवारी संध्याकाळी सिस्तान-बलूचिस्तान या सीमावर्ती भागात घुसून दहशतवादी शाहबख्शला संपवलं. अलीकडेच दोन्ही देशांनी परस्परांवर हवाई हल्ले केले होते.

अल अरबिया न्यूज रिपोर्टनुसार, जैश अल-अदलची स्थापना वर्ष 2012 मध्ये झाली होती. इराणने जैश अल-अदलला दहशतवादी संघटना जाहीर केलय. हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे. ही संघटना इराणचा दक्षिणपूर्व प्रांत सिस्तान-बलूचिस्तानातून ऑपरेट करते. मागच्या काही वर्षात जैश अल-अदलने इराणी सैन्याच्या जवानांना टार्गेट केलय. त्यांच्यावर हल्ले केलेत. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात जैश अल-अदलने सिस्तान-बलूचिस्तानमधील एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात कमीत कमी 11 पोलिसांचा मृत्यू झाला होता.

इराण-पाकिस्तानच्या बैठकीत काय ठरलेलं?

मागच्या महिन्यात इराण आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी परस्परांच्या हवाई क्षेत्रात घुसून एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर इराण आणि पाकिस्तान परस्परांना सुरक्षा सहकार्य करण्यास राजी झाले होते. या कराराची घोषणा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी आणि त्यांचे इराणी समकक्ष होसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती. ही प्रेस कॉन्फरन्स पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात झाली होती. इराण आणि पाकिस्तान परस्पराबद्दलचे गैरसमज लवकरच मिटवतील असं जिलानी यांनी म्हटलं होतं. दोन्ही देश दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आणि परस्परांच्या चिंता मिटवण्यावर सहमत झाले होते.

इराणने पाकिस्तानवर पहिला हल्ला कधी केलेला?

इराणने पुन्हा एकदा हल्ला केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणने 16 जानेवारीला रात्री उशिरा जैश अल-अदलचे दोन हेडक्वॉर्टर्स नष्ट करण्यासाठी पाकिस्तानात मिसाइल आणि ड्रोन हल्ला केला होता. इराणच्या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

पाकिस्तानने इराणच्या हल्ल्याला कधी प्रत्युत्तर दिलेलं?

हल्ल्यानंतर पाकिस्तानने 17 जानेवारीला इराणमधून आपल्या राजदूताला माघारी बोलवून घेतलं. त्यानंतर 18 जानेवारीला पाकिस्तानने इराणमध्ये घुसून कारवाई केली होती. पाकिस्तानने सुद्धा एअर स्ट्राइक केला होता. बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) या ठिकाणांना लक्ष्य केल्याच पाकिस्तानने म्हटलं होतं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.