Iran Attacks Israel Live Updates: इराण-इस्रायल संघर्षावर भारताची भूमिका काय?
Iran Attacks Israel : लेबनानमध्ये ग्राऊंड ऑपरेशननंतर इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. इराणने इस्रायलमधील 100 पेक्षा जास्त ठिकाणी 200 बॅलेस्टिक मिसाइल्स डागले. मोसाद हेडक्वार्टर आणि 20 F-35 फाइटर जेट्सचा खात्मा केल्याचा दावा इराणने केला आहे. इस्रायलने इराणचे अनेक मिसाइल्स हवेतच पाडले.
हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर मिडल ईस्टमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इस्रायली सैन्याची लेबनानमध्ये कारवाई सुरु असतानाच इराणने इस्रायलवर मिसाईल हल्ला केला आहे. इराणकडून 180 पेक्षा जास्त मिसाइल डागण्यात आली. काही हल्ले सेंट्रल इस्रायलमध्ये तर काही दक्षिण इस्रायलमध्ये करण्यात आले. जास्तीत जास्त मिसाइल पाडण्यात इस्रायलला यश आलं. इराणच्या हल्ल्यानंतर युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. आता मिडिल ईस्टमध्ये महाविनाश रोखणं कठीण आहे. इराणला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा इस्रायलने दिला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्य पलटवार करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलकडे योजना तयार आहे. हल्ला कसा करायचा, कुठे करायचा आणि वेळ काय असेल? हे आम्ही ठरवू असं आयडीएफ प्रवक्त्याने म्हटलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Iran Attacks Israel live : अन्य मुस्लिम देशांबरोबर मैत्री मग इराण बरोबर इस्रायलच इतकं कट्टर शत्रुत्व का?
इस्रायल सुन्नी देशांना आपला शत्रु मानत नाही. मिडिल ईस्टमधल्या घडामोडींसाठी इस्रायल इराणला दोषी मानतो. असं का? समजून घेऊया. वाचा सविस्तर….
-
Iran Attacks Israel live : युद्धाची स्थिती असताना भारताच्या तीन शक्तीशाली युद्धनौका इराणमध्ये दाखल
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा ताफा इराणमध्ये पोहोचलाय. इस्रायल-हिज्बुल्लाह युद्धादरम्यान भारतीय युद्धनौका इराणमध्ये पोहोचण्याचे बरेच अर्थ काढले जात आहेत. इस्रायल-हिज्बुल्लाह संघर्षाने टोक गाठलय. भारतीय नौदलाच्या युद्धनौका इराणमध्ये का गेल्यात? वाचा सविस्तर….
-
-
Iran Attacks Israel live : इराण-इस्रायल संघर्षावर भारताची भूमिका काय?
पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे. भारताने सर्व संबंधित पक्षांना संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे. सर्व मुद्दे चर्चा आणि कुटुनितीच्या माध्यमातून सोडवण्याच आम्ही आवाहन करतो असं भारताने इराण-इस्रायल तणावावर म्हटलं आहे.
-
Iran Attacks Israel live : इस्रायल इराणवर कशा प्रकारचा हल्ला करेल? इस्रायलकडे कुठली सर्वात मोठी संधी ?
इराणने सर्वात मोठी चूक केलीय. कारण त्यांनी इस्रायलला आयती संधी दिलीय. इस्रायल ही संधी सोडणार नाही. इस्रालय इराणवर कशा प्रकारचा हल्ला करेल, त्याचं उत्तर तुम्हाला यामध्ये मिळेल. वाचा सविस्तर….
-
Iran Attacks Israel live : इराण पाठोपाठ पुन्हा एकदा इस्रायलवर क्रूज मिसाइलने हल्ला
इस्रायलच्या आत खोलवर क्रूज मिसाइलने हल्ला केल्यााच दावा हुती बंडखोरांनी केला आहे. हुती ही येमेनमधील बंडखोर संघटना आहे. त्यांना इराणच समर्थन प्राप्त आहे. हुती बंडखोरांनी याआधी सुद्धा इस्रायलवर हल्ले केले आहेत. इस्रायलने ताज्या हल्ल्याची अजून पृष्टी केलेली नाही.
-
-
Iran Attacks Israel live : भारतीय विमान कंपन्यांसाठी एडवायजरी जारी होणार का?
इराण-इस्रायलमध्ये युद्धाची स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार भारतीय विमान कंपन्यांसाठी एडवायजरी जारी करु शकते. एअर इंडियाच्या दोन्ही देशातून विमान वाहतुकीवर प्रतिबंध घातला जाऊ शकतो. एअर इंडिया सुद्धा आपला रुट बदलण्याचा विचार करत आहे.
-
Iran Attacks Israel live : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना महत्त्वाची सूचना
इराणमध्ये जाऊ नका असं भारत सरकारकडून सांगण्यात आलय. “आमचं या भागातील परिस्थितीवर लक्ष आहे. भारतीय नागरिकांना इराणचा दौरा न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्यास सांगितलं आहे”
MEA says, “We are closely monitoring the recent escalation in security situation in the region. Indian nationals are advised to avoid all non-essential travel to Iran. Those currently residing in Iran are requested to remain vigilant and stay in contact with the Indian Embassy in… pic.twitter.com/uh1wZb4e4v
— ANI (@ANI) October 2, 2024
-
Iran Attack Israel : ‘या’ देशाच्या ग्रीन सिग्नलनंतरच इराणचा इस्रायलवर हल्ला
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इराणचा हल्ला रोखण्यासाठी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक फोन कॉल केला होता. पण समोरुन तो फोन उचलला नाही. वाचा सविस्तर….
-
Iran Attacks Israel live : अमेरिकेची शक्तीशाली युूद्धनौका इस्रायलच्या मदतीसाठी निघाली
इराण विरुद्ध संघर्षात इस्रायलला अमेरिकेची साथ आहे. पेन्टागॉनने त्यांच्या अण्वस्त्र सज्ज विमानवाहू युद्धनौकेला तिथेच थांबण्याचे आदेश दिले आहेत. दुसरी युद्धनौका इस्रायलच्या मदतीसाठी तिथे येण्यास निघाली आहे. इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केल्यामुळे या प्रदेशात तणाव टोकाला पोहोचला आहे.
-
Iran Attacks Israel live : इराण- इस्रायलमध्ये भारताचा खास कोण? आपल्याला कोणाची जास्त गरज?
Iran vs Israel : इस्रायलची भारताला जितकी गरज आहे, तितकीच इराणची सुद्धा आहे. पण या दोन देशांपैकी जास्त कोण खास? हा प्रश्न येतो. वाचा सविस्तर….
-
Iran Attacks Israel live : डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन बॉम्बस्फोट
डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या या दोन बॉम्बस्फोटांचा तपास सुरु आहे असं कोपेनहेगन पोलिसांनी सांगितलं.
-
Iran Attacks Israel live : इराणसारखे पाकिस्तानने एकाचवेळी हजारो रॉकेट डागले तर भारताची तयारी काय?
चीन-पाकिस्तान भरोशाचे शेजारी नाही. उद्या त्यांनी इराणसारखा हल्ला केला, एकाचवेळी हजारो रॉकेट्स डागले तर भारताची तयारी काय आहे? आपण त्यांचा रॉकेट हल्ला परतवून लावण्यासाठी सक्षम आहोत का? आपली तयारी काय आहे? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….
-
Iran Attacks Israel live : इराण-इस्रायल संघर्ष युद्धात बदलला तर भारताचं काय नुकसान होईल?
Iran-Israel War Impact : इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यामुळे टेन्शन वाढलं आहे. दोन्ही देशांसोबत भारताचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे दोन्ही देश भारतावर किती प्रमाणत आणि भारत त्यांच्यावर किती प्रमाणात अवलंबून आहे ते जाणून घ्या. हा संघर्ष युद्धात बदलला तर भारताच काय नुकसान होईल? वाचा सविस्तर…
-
Maharashtra News: महात्मा गांधी जयंती निमित्ताने सामूहिक सूत कताईचा उपक्रम
छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम विद्यापीठत आगळावेगळा उपक्रम… शेकडो विद्यार्थ्यांनकडून सामूहिक सूत कताई सुरू… पारंपरिक ते आधुनिक मशीनच्या साह्याने सूतकताई सुरू… एमजीएम विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी सूतकताई कार्यक्रमात सहभागी…
-
Maharashtra News: धुळे जिल्ह्यात अनेक शेतामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव…
धुळे जिल्ह्यात अनेक शेतामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव… अती पावसामुळे रोगराई… सोयाबीनची पाने पडू लागली पिवळी… रोगामुळे उत्पन्न घटन्याची शक्यता… यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढलेला असताना दुसरीकडे मात्र सोयाबीनवर रोगराई… कृषी खात्याने मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी…
-
Maharashtra News: 2029 आधी सरकार राहणार की नाही, ते बघा – संजय राऊत
अमित शाहांना स्वप्नदो झालाय… 2029 आधी सरकार राहणार की नाही, ते बघा…, चोऱ्या – माऱ्या करून तुम्ही यावेळी निवडणूक जिंकली… भाजप जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालाय… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: सुनील तटकरे यात हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते
सुनील तटकरे यात हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते… मुंबईतून सुतारवाडीसाठी यात हेलिकॉप्टरने तटकरे प्रवास करणार होते… हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू
-
Iran Attacks Israel live : इराणने इस्रायल विरोधात कुठली अत्याधुनिक मिसाइल वापरली?
इराणने पहिल्यांदाच इस्रायल विरोधात त्यांची अत्याधुनिक मिसाइल्स वापरली. यामध्ये Fattah मिसाइल सुद्धा आहे. एक्सपर्ट्सनुसार, इस्रायलने पहिल्यांदाच या मिसाइलचा वापर केला. IRGC ने सुद्धा याला दुजोरा दिला आहे.
-
Iran Attacks Israel live : इराणची मिसाइल जॉर्डनमध्ये कोसळून किती जखमी?
इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर मिसाइल हल्ला केला. यावेळी काही मिसाइल्स जॉर्डनमध्ये कोसळले. रिपोर्ट्सनुसार यामध्ये तीन लोक जखमी झाले आहेत.
-
Iran Attacks Israel live : हल्ल्यानंतर इराणचा मोठा दावा, तेहरानमध्ये सेलिब्रेशन
यावर्षी एप्रिल महिन्यातही इराणने इस्रायलवर अशाच प्रकारचा हल्ला केला होता. हा हल्ला त्यापेक्षाही मोठा आणि अचूक होता असा इराणचा दावा आहे. इराणी मिसाइल्स इस्रायलमध्ये पोहोचण्याआधीच नष्ट केली जातात. पण इराणचा दावा आहे की, त्यांची….इथे क्लिक करुन वाचा
-
Iran Attacks Israel live : भयानक, इराणकडून हायपरसोनिक मिसाइल हल्ला, त्यामुळे काय नुकसान?
इराणने इस्रायलवर 180 पेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागले. यातील बहुतांश मिसाइल्स एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केले. पण इराणने हायपरसोनिक मिसाइल्सही डागली. ती इस्रायल, अमेरिकेला रोखता आली नाहीत. इस्रायलच्या तीन एअर बेसचा या मिसाइल्समुळे नुकसान झालय.
-
Iran Attacks Israel live : मिडल ईस्टमधल्या संकटावर जयशंकर काय बोलले?
परराष्ट्र एस. जयशंकर यांनी मिडल ईस्टमधल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. इस्रायल आणि इराणमधल्या या कठीण काळात भारत समन्वयकाच्या भूमिकेसाठी तयार आहे असं म्हटलं आहे. त्याचवेळी 7 ऑक्टोबरला हमासने दक्षिण इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याला भारत दहशतवादी हल्लाच मानतो हे जयशंकर यांनी स्पष्ट केलं. जयशंकर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. कुठल्याही देशाने प्रत्युत्तर देताना आंतरराष्ट्रीय मानवी कायदे लक्षात घ्यावेत असं सुद्धा जयशंकर म्हणाले. सामान्य नागरिकांना कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी असं जयशंकर म्हणाले.
Published On - Oct 02,2024 8:51 AM