इराण की इस्रायल कोणाची पॉवर जास्त, नेतन्याहू म्हणाले, ‘जोरदार उत्तर देणार’

iran israel war news: इराणच्या हल्ल्याचे पडसाद आता जगभर उमटण्यास सुरुवात झाली आहे. जॉर्डनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इस्त्रायलने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. 

इराण की इस्रायल कोणाची पॉवर जास्त, नेतन्याहू म्हणाले, 'जोरदार उत्तर देणार'
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 7:48 AM

इस्त्रायल आणि हमास युद्धाचे ढग अजून निवळले नाही. तोच गेल्या आठवड्यापासून इराण आणि इस्त्रायल युद्धाचे ढग दाटले होते. अखेर इराणने त्याची सुरुवात केली. रमजान महिना संपल्यानंतर इराणने इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्र डागले डागले. त्यानंतर आता इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्करी अधिकारी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. तसेच देशाला संबोधित करताना त्यांना आमचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही? जोरदार उत्तर देऊ, अशी घोषणा केली आहे. यामुळे इराणने युद्धविरामची घोषणा केली असली तरी इस्त्रायल आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय म्हणाले नेतन्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, “इस्रायलच्या नागरिकांनो, आमची संरक्षण यंत्रणा तैनात आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही संरक्षण आणि आक्रमक दोन्हीसाठी सज्ज आहोत. इस्रायल मजबूत आहे. IDF मजबूत आहे आणि आमची जनताही मजबूत आहे. आम्ही अमेरिकेच्या भूमिकेचे कौतुक करतो. इस्रायलसह, तसेच ब्रिटन, फ्रान्स आणि इतर अनेक देशांचा पाठिंबा आम्हाला मिळाला आहे.

सोडणार नाही, उत्तर देऊ

नेतन्याहू म्हणाले, आमचे धोरण स्पष्ट आहे. जो कोणी आमचे नुकसान करेल, त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही कोणत्याही धोक्यापासून स्वतःचा बचाव करू. आम्ही एकत्र उभे राहू आणि आमच्या सर्व शत्रूंवर मात करू. इस्रायलमधील नागरिकांना IDF होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. ”

हे सुद्धा वाचा

इराणच्या हल्ल्याचे पडसाद आता जगभर उमटण्यास सुरुवात झाली आहे. जॉर्डनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इस्त्रायलने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.

कोणाची किती आहे सैन्यशक्ती

इस्त्रायल

  • सैनिक ६ लाख ७० हजार
  • संरक्षण अर्थसंकल्प – २ लाख कोटी
  • रणगाडे- १३७०
  • युद्धनौका – ६४
  • विमाने – ६१२

इस्त्रायल

  • सैनिक ११ लाख ८० हजार
  • संरक्षण अर्थसंकल्प – ८३ हजार कोटी
  • रणगाडे- १९९६
  • युद्धनौका – १०१
  • विमाने – ५५१
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.