ईदच्या आधी इस्रायलवर हल्ला करु शकतो इराण, कमांडरच्या मृत्यूचा बदला घेणार
जगात परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे सगळीकडे शांती प्रस्थापित करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत असताना अनेक ठिकाणी युद्धाची परिस्थिती आहे. युक्रेन-रशिया युद्धानंतर आता इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध होण्याची शक्यता आहे.
जगात सध्या अशांतीचे वातावरण आहे. एकीकडे अनेक महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे इस्रायलकडून हमासवर हल्ले सुरु आहे. यामुळे गाझा शहर पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. त्यातच आता येमेनमधील इराणच्या दूतावासावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धाचा धोका वाढला आहे. आपल्या कमांडरच्या मृत्यूनंतर इराणने बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे इराण कधीही इस्रायलवर हल्ला करु शकतो. रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इराण हा हल्ला करु शकतो. जेरुसलेम दिनानिमित्त इस्रायलच्या नॅशनल सायबर डायरेक्टोरेटने या काळात देशावर सायबर हल्ले होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. संचालनालयाने म्हटले आहे की, इस्रायलवर सायबर हल्ल्या होऊ शकतो.
जेरुसलेम डे 5 एप्रिल रोजी आयोजित केला जाणार आहे, त्यानंतर इराणने लोकांना 7 एप्रिल रोजी #OpJerusalem आणि #OpIsrael या हॅशटॅगमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या हॅशटॅगचा उद्देश जगभरातील लोकांना इस्रायलवर हल्ले करण्यास उद्युक्त करणे हा आहे.
या दिवशी इस्रायलवर अनेक सायबर हल्ले होऊ शकतात, अशी भीती नॅशनल सायबर डायरेक्टोरेटने व्यक्त केली आहे. या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकते. इस्रायलविरुद्ध अनेक चुकीची माहिती पसरू शकते. दरवर्षी जेरुसलेम दिनी इस्रायलवर असेच हल्ले होत असतात, इस्त्राईल या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरत आहे. सीरियातील इराण दूतावासावरील हल्ल्यानंतर काही दिवसांनीच यावर्षी जेरुसलेम दिन येत आहे, त्यामुळे या वेळी हे हल्ले अधिक क्षमतेने होऊ शकतात.
इराणी जेरुसलेम दिन दरवर्षी रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी साजरा केला जातो आणि संपूर्ण इराण, पॅलेस्टिनी प्राधिकरण तसेच सायबर स्पेसमध्ये इस्रायलविरोधी आक्रमक क्रियाकलापांच्या प्रात्यक्षिकांसाठी ओळखला जातो.
दरवर्षी, या काळात अनेक सायबर हल्ले केले जातात, जसे की वेबसाइट नष्ट करणे, स्मार्ट होम सिस्टम ताब्यात घेणे, फिशिंग संदेश असलेले मजकूर संदेश पाठवणे, सोशल नेटवर्क्समध्ये हॅकिंग करणे, कंपनीच्या डेटाबेसमध्ये घुसखोरी करणे आणि माहिती लीक करणे.