Hassan Nasrallah : नसरल्लाहच्या मृत्यूला जबाबदार असणारा लेबनानमध्ये उपस्थित, इराण बदला घेणार का?
Hassan Nasrallah Killing Probe : हिज्बुल्ला चीफ हसन नसरल्लाहची टीप कोणी दिली? याची सध्या इराणकडून चौकशी सुरु आहे. नरसल्लाहची टीप देणारे वरिष्ठ पातळीवरचा कोणीतरी असावा असा दाट संशय आहे. आता तो व्यक्ती लेबनानमध्ये असून इराण बदला घेणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
इराणच्या सिस्टिममध्ये इस्रायलने कितपत घुसखोरी केलीय, त्याचं सर्वात मोठ उदहारण आहे, इराणच्या कुद्स फोर्सचा कमांडर इस्माइल कानी. नसरल्लाहच्या ठिकाणाबद्दल इस्माइल कानीनेच इस्रायलला टीप दिल्याचा संशय आहे. हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहच्या मृत्यूला जबाबदार कोण? याची चौकशी सुरु असून इस्माइल कानी रडारवर आहे. आधी बातमी होती की, बेरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर इस्माइल कानी बेपत्ता आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर इस्माइल कानी मारला गेला, असा संशय होता. पण आता मिडिल ईस्टमधून आलेल्या एका रिपोर्ट्नुसार, इस्माइल कानी जिवंत आणि सुरक्षित असल्याच सांगितलं जातय. इराणचे तपास अधिकारी नसरल्लाहच्या मृत्यू प्रकरणी कानीची चौकशी करतायत.
27 सप्टेंबरला बेरुत येथे झालेल्या स्फोटात हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. नसरल्लाहच्या ठिकाणाबद्दल इस्रायलला इराणच्याच कुठल्या तरी हेराने माहिती दिली असं बोललं जातय. इराणच्या टॉप लीडरशिपमध्ये कोणीतरी इस्रायलचा हेर असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे हिज्बुल्लाह आणि IRGC ची चिंता वाढली आहे.
IRGC ने चौकशी सुरु केली
इस्माइल कानी सार्वजनिक स्थळी दिसलेला नाही. हिज्बुल्लाह चीफच्या मृत्यूनंतर इराणच्या IRGC ने चौकशी सुरु केली. इस्रायलला नसरल्लाहच्या ठिकाणाबद्दल माहिती कशी मिळाली?. इस्माइल कानी आणि त्याची टीम रडारवर आहे. त्यांना कस्टडीत घेऊन चौकशी सुरु आहे, असं मिडल ईस्ट आयने सांगितलं.
कधी महत्त्वाच्या पदावर नियुक्ती?
इस्माइल कानी इराणच्या टॉप कमांडरपैकी एक आहे. जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानीचा मृत्यू झाल्यानंतर कानीला कुद्स फोर्सच प्रमुख बनवण्यात आलं. याआधी तो इराणच्या काऊंटर इंटेलिजेंस यूनिटचा भाग होता. सुलेमानीच्या मृत्यूनंतर इराणच्या सैन्य रणनितीला मजबूत करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. आता इस्माइल कानीवर तो मोसादचा एजंट तर नाही ना? असा संशय आहे.