Iran Attack on Israel : इराणने हल्ल्यासाठी कुठली ड्रोन्स, मिसाइल वापरली? प्रत्यक्ष किती नुकसान? महत्त्वाची माहिती समोर
Iran Attack on Israel : इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. इराणच्या दूतावासावर हल्ला झाल्यानंतर यावेळी इस्रायलला सोडणार नाही, आम्ही त्यांना धडा शिकवणार अशी भूमिका इराणने घेतली होती. त्यामुळेच अनेक देशांनी आपल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलमध्ये जाऊ नका, असा सल्ला दिला होता. अखेर इराणने इस्रायलवर हल्ला केला.
इराणने इस्रायलवर भीषण हल्ला केलाय. इराणने 200 ड्रोन्स, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलद्वारे हा हल्ला केला. अजूनही हा हल्ला सुरुच आहे, असं इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलय. सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये 1 एप्रिलला इराणच्या दूतावासावर इस्रायलकडून एअर स्ट्राइक करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हा ड्रोन हल्ला केला आहे. इराणच्या सरकारने 200 किलर ड्रोन्स, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलद्वारे हा हल्ला चढवला. स्वॅर्म म्हणजे झुंडीच्या स्वरुपात हे ड्रोन्स डागण्यात आले. इराणच्या या हल्ल्यात, एक मुलगी जखमी झाली आहे.
इस्रायलकडून एक स्टेटमेंट जारी करण्यात आलय. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “इस्रायलच्या दिशेने येणारी बहुतांश मिसाइल आमच्या भूमीत प्रवेश करण्याआधीच हवेतच ओळखून नष्ट करण्यात आली” इस्रायलकडे आर्यन डोमच सुरक्षा कवच आहे. ही इंटरसेप्टर प्रणाली शत्रूने डागलेली मिसाइल, रॉकेट आणि ड्रोन्सना हेरुन हवेतच संपवते. इस्रायलवरील हवाई धोके परतवून लावण्यासाठी इस्रायली फायटर जेट्सनी आपल काम सुरु केलय, असं इस्रायलकडून सांगण्यात आलय.
Prime Minister of Israel tweets, “Prime Minister Benjamin Netanyahu is currently speaking with US President Joe Biden, following the deliberations of the Security Cabinet and the War Cabinet.” pic.twitter.com/xlPV0hlXj3
— ANI (@ANI) April 14, 2024
हल्ल्यात इस्रायलच किती नुकसान?
इराणने केलेल्या या हल्ल्यात बेसच किरकोळ नुकसान झालय असं इस्रायलकडून सांगण्यात आलं. प्रत्युत्तर दिल्यानंतर आता विषय संपला असं तुम्ही समजू शकता, असं इराणने म्हटलं आहे. एक प्रकारे इराणने आता विषय वाढवू नका, युद्ध नको अशी भूमिका घेतली आहे.