Israel-Iran Relation : मोसावी नंतर जाहेदी…इराण फक्त तोंडाने बोलतच राहणार की, बदला पण घेणार
इराण आता काय करतो? त्याकडे जगाच लक्ष असेल. कारण इराणने बदला घेण्याची घोषणा केली आहे. सीरियामध्ये इराणच्या दूतावासावर इस्रायलने F-35 फायटर जेटमधून स्ट्राइक केला. त्याच्याआधी IRGC चे जर्नल कासिम सुलेमानी 2020 साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाले होते.
सीरियामध्ये इराणच्या दूतावासावर झालेल्या हवाई हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियन अधिकारी रामी अब्देल रहमान यांच्यानुसार हे सर्व फायटर होते. एकही सर्वसामान्य नागरिक या हल्ल्यात ठार झालेला नाहीय. बातम्यांनुसार, इराणचे दोन टॉप कमांडर मोहम्मद रजा जाहेदी आणि मोहम्मद हादी हजरियाही यांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रजा अनेक वर्षापासून सैन्यात होते. दोन्ही कमांडर्सनी इराणसाठी अनेक ऑपरेशन्स केली होती. त्यांच्याआधी IRGC चे जर्नल कासिम सुलेमानी 2020 साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाले. इराणने या हल्ल्याचा निषेध केला आहे. तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इस्रायलला इशारा दिला आहे. या हल्ल्यात मारले गेलेले कमांडर्स अनेक मिशन्समध्ये इराणचा भाग होते.
मोहम्मद रजा जोहेदी इराणी सैन्यातील टॉप कमांडर होते. 2015 पर्यंत इराक-सीरिया कुद्स फोर्सचे प्रमुख होते. बिगर पारंपारिक युद्धात माहीर होते. इराण-इराक युद्धात मध्य रँकिंग कमांडर होते. 1979 च्या क्रांतीनंतर ते IRGC मध्ये आले. इराणने दोन्ही कमांडर्सच्या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा केली आहे. इराण आता इस्रायल विरोधात कधी प्रत्युत्तराची कारवाई करतो, त्याकडे लक्ष असेल.
मोसाद कोणाच्या मागावर होती?
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात इस्रायलने इराणचा कमांडर सैयद रजी मोसावीची सीरियामध्ये हत्या केली. इस्रायलने याआधी सुद्धा मोसावीला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. कारण आज जो हिज्बुल्लाह इस्रायलच्या मार्गात मोठा अडथळा बनून उभा आहे, त्याच हिज्बुल्लाहला उभ करण्यात मोसावीचा मोठा रोल होता. मोसाद बऱ्याच काळापासून मोसावीच्या शोधात होती.
तो बदला इराण कधी घेणार?
त्याआधी इराणी रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने संपवलं होतं. त्यावेळी सुद्धा इराणने बदला घेण्याची घोषणा केली होती. पण इराण अजूनपर्यंत बदला घेऊ शकलेला नाही. सुलेमानी यांनी इराणी रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्समध्ये अल-कुद्स फोर्सच नेतृत्व केलं होतं. अमेरिकेने IRGC ला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.