Israel-Hezbollah War : मध्य-पूर्व पुन्हा युद्धाच्या खाईत, इस्रायल आणि हिज्बुल्लाह आमनेसामने का? 5 मुद्द्यांमधून घ्या समजून
इस्रायलने बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आज इस्रायलने लेबनानवर रॉकेटचा मारा केला आहे. 300 हून अधिक रॉकेटचा मारा करून इस्रायलने लेबनानचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मध्य पूर्वेकडील देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती का उद्भवली? त्या आधी काय घडलं होतं? त्यावर टाकलेला हा प्रकाश.
Israel-Hezbollah War: लेबनानमध्ये इस्रायलच्या हल्ल्याने मध्य-पूर्वेकडील देश पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत सापडले आहेत. आपल्या कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हिज्बुल्लाहने प्रत्युत्तर म्हणून हल्ला सुरू केला आहे. आतापर्यंत आपण इस्रायलवर 320 रॉकेटचा सपासप मारा केल्याचा दावा हिज्बुल्लाह यांनी केला आहे. हिज्बुल्लाह यांनी दक्षिण लेबनानवर सर्वाधिक हल्ला केल्याचं सुतोवाच इस्रायलच्या सैन्याने केलं आहे. ज्या ज्या ठिकाणी धोका आहे, त्या सर्वच ठिकाणी आम्ही हल्ले करू, असा इशाराही हिज्बुल्लाह यांनी दिला आहे.
पहिला मुद्दा
हिज्बुल्लाह यांनी उचललेल्या या कठोर पावलांमुळे मध्य पूर्वेतील देश संकटात सापडले आहेत. इस्रायलच्या सैन्याने लेबनानवरील हल्ल्याचा मारा सुरूच ठेवला आहे. या हवाई हल्ल्यामुळे लेबनानचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. हिज्बुल्लाह यांनी मोठ्या प्रमाणावर रॉकेट आणि ड्रोनचा मारा केला आहे.
दुसरा मुद्दा
हिज्बुल्लाह यांनी आयडीएफ या दहशतवादी संघटनेचे मनसुभे ओळखले आहेत. ही संघटना इस्रायलच्या क्षेत्रात मिसाईल आणि रॉकेट डागण्याची तयारी करत आहे. या धोक्याचं उत्तर म्हणूनच आयडीएफच्या लेबनानमधील दहशतवादी तळांवर हिज्बुल्लाह यांनी हल्ला चढवला आहे.
तिसरा मुद्दा
हिज्बुल्लाह यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. इस्रायलकडून लेबनानवर 320 हून अधिक रॉकेट डागण्यात आले आहेत. आम्ही 11 सैन्य तळांवर निशाणा साधला आहे. गेल्या महिन्यात बेरूतमध्ये एका उपनगरात झालेल्या हल्ल्यात आमच्या कमांडरची हत्या करण्यात आली. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हा पहिला फेज आहे, असं हिज्बुल्लाह यांचा दावा आहे.
चौथा मुद्दा
गेल्या महिन्यात इस्रायलच्या ताब्यातील गोलान हाइट्सवर लेबनानकडून मिसाईलचा हल्ला करण्यात आला होता. त्यात 12 तरुणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने बेरूतमध्ये हिज्बुल्लाहचे एक वरिष्ठ कमांडर शुकर याची हत्या करण्यात आली होती.
पाचवा मुद्दा
दुसरीकडे, तेहरानमध्ये हमास नेता इस्माईल हनिया यांची हत्या करण्यात आल्याने परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे ईराणने इस्रायलच्या विरोधात प्रत्युत्तर म्हणून कारवाई करण्याची शपथ घेतली होती. हिज्बुल्लाह यांनी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या शस्त्रधारींवर हल्ला केला होता. त्याचं उत्तर म्हणून इस्रायलच्या तळांवर मिसाईलचा मारा करण्यात आला आहे. आता दोन्हीबाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे.
जगावर काय परिणाम?
इस्रायल आणि हिज्बुल्लाह यांच्या दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाने जगासमोर वेगळंच संकट उभं केलं आहे. कारण इस्रायल आणि हमासच्या दरम्यान युद्ध सुरू आहे. आता हिज्बुल्लाहमध्ये आल्याने त्याचा जगावर मोठा खतरनाक परिणाम होण्याची शक्यता आहे. या तणावात ईराणचाही सहभाग असल्याचं दिसतंय.
तणाव वाढला तर ऊर्जापासून ते आर्थिक संरक्षणापर्यंत सुरक्षेचा धोका वाढू शकतो. त्याचा थेट परिणाम भारतावरही पडू शकतो. कारण भारत मोठ्याप्रमाणावर मध्य पूर्वेकडून तेलाची खरेदी करतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर या प्रकरणात अमेरिका इस्रायलच्या सोबत आहे.