Israel News | गाझा नाही, ‘या’ सीमेवर कधीही भडकेल युद्ध, इस्रायल अख्ख शहर करणार रिकामी
Israel News | इस्रायलला एक शहर खाली करायचा निर्णय घ्यावा लागला आहे. महत्त्वाच म्हणजे गाझा पट्टीत अजून भीषण युद्ध होण्याची शक्यता असताना आता दुसऱ्याच सीमेवर परिस्थिती चिघळली आहे. तिथे इस्रायलला लक्ष द्याव लागतय. खबरदारी म्हणून शहर खाली करण्यात आलय.
जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. गाझा पट्टीजवळ इस्रायली सैन्य, रणगाडे सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसेल अशी स्थिती आहे. सध्या गाझापट्टीत इस्रायलकडून हवाई हल्ले सुरु आहेत. इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसल्यानंतर एकाचवेळी अनेक फ्रंट उघडले जाऊ शकतात. इस्रायलला एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढाव लागेल. सध्या लेबबॉन सीमेवर हेझबोल्लाहकडून इस्रायलला आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय. हेझबोल्लाह या दहशतवादी गटाला इराणच समर्थन प्राप्त आहे. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई सुरु केल्यापासून लेबबॉन सीमेवर हेझलबोल्लाहकडून इस्रायलला आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय. सध्या लेबनॉन सीमेवर इस्रायल आणि हेझबोल्लाहमध्ये संघर्ष वाढला आहे. दोन्ही बाजूने गोळीबार आणि रॉकेट हल्ले सुरु आहेत.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. इस्रायलने त्यांचं उत्तरेकडच शहर किर्यत रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायली सैन्याने आज शुक्रवारी ही घोषणा केलीय. “थोड्याचवेळापूर्वी नॉर्दन कमांडने शहराच्या महापौराला या निर्णयाची माहिती दिलीय. स्थानिक यंत्रणा निर्णयाचा अमलबजावणी करतील” असं लष्कराने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. 7 ऑक्टोबरला हमासचे दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी निरपराध नागरिकांची हत्या केली. महिला, लहान मुलांवर अत्याचार केले. यात 1400 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर सर्व संघर्षाला सुरुवात झाली. इस्रायलने कुठे हल्ला केला?
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 3700 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासच नियंत्रण असलेल्या भागातील आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय. आमच सैन्य हेझबोल्लाहच्या ठिकाणांना सातत्याने लक्ष्य करतय असं इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आलं. हेझबोल्लाहच्या टेहळणी चौक्यांसह इन्फ्रास्ट्रक्चरवर इस्रायलने हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या दिशेने रणगाडाविरोधी मिसाइल डागणाऱ्या तीन दहशतवाद्यांना इस्रायलच्या फायटर जेट्सनी यमसदनी पाठवलं. इस्रायल आणि हेझबोल्लाहमध्ये शेवटची लढाई 2006 साली झाली होती. यात लेबनॉनमध्ये 1200 मृत्यू झाले होते. इस्रायलच्या बाजूला 160 जणांचा मृत्यू झाला होता. इराण सुद्धा या युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.