Israel Attack Iran : एकाचवेळी 100 फायटर जेट, इराणची पुरी वाट लावली, वापरलं जगातील सर्वात घातक F-35
Israel Attack Iran : इस्रायल इराणवर हल्ला करणारं हे अमेरिकेला माहित होतं. पण अमेरिकेने या हल्ल्यात थेट सहभाग घेतला नाही. या कारवाईनंतर इस्रायल हाय-अलर्टवर आहे. इराण किंवा त्यांच्या प्रॉक्सीकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते.
इराणने ऑक्टोंबर महिन्याच्या 1 तारखेला इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला करण्याचं धाडस केलं होतं. आज बरोबर 25 दिवसांनी इस्रायलने इराणला असं उत्तर दिलय, जे ते कधी विसरणार नाहीत. इस्रायली हल्ल्याने इराणला हादरवून सोडलय. इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी 100 फायटर जेट्सचा वापर केला. त्यावरुन हल्ला किती भीषण असेल, त्याची कल्पना येते. इराण आणि इस्रायलची सीमा लागून नाहीय. दोन्ही देशांमध्ये भरपूर अंतर आहे. इराणवर हल्ल्यासाठी इस्रायली एअर फोर्सने जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास केला. इराणवरील हा आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला आहे. आम्ही हे आत्मरक्षणासाठी केलय असं इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायलने इराण विरोधात 100 फायटर जेट्स वापरली. यात सर्वात घातक F-35 फायटर विमान सुद्धा होतं. अमेरिकेने निर्मिती केलेलं हे फायटर विमान जगातील निवडक देशांकडे आहे. F-35 हे आजच्या घडीला जगातील हे सर्वात घातक अत्याधुनिक फायटर विमान आहे.
इस्रायलने इराणची राजधानी तेहरान आणि रणनीतिक शहर करजवर हल्ला केला. संघर्ष वाढू नये, यासाठी इराणच्या न्यूक्लियर आणि तेल फॅसिलिटीवर हल्ला केलेला नाही असं IDF कडून सांगण्यात आलं. हा हल्ला करण्याआधी अमेरिकेला आगाऊ कल्पना देण्यात आली होती. इस्रायल इराणवर हल्ला करणारं हे अमेरिकेला माहित होतं. पण अमेरिकेने या हल्ल्यात थेट सहभाग घेतला नाही. या कारवाईनंतर इस्रायल हाय-अलर्टवर आहे. इराण किंवा त्यांच्या प्रॉक्सीकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते.
…तर इराणची प्रतिष्ठा धुळीस मिळेल
अशा प्रकारच्या मिशन्समध्ये मोठ्या शस्त्रास्त्रांसह दूर पल्ला गाठण्यासाठी जेटमध्ये इंधन भरण्याची गरज भासू शकते. त्याशिवाय इस्रायलच 669 रेसक्यू यूनिट सुद्धा हाय-अलर्टवर असतं. इराण, इराक, येमेन, सीरिया आणि लेबनानमधील घडामोडींवर आता IDF ची बारीक नजर आहे. कारण इराणने संबंधित देशांमध्ये पोसलेल्या दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ला करु शकतात. अत्यंत अचूकतेने हे हल्ले केल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे. शनिवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही कारवाई झाली. एअर स्ट्राइक कुठे-कुठे केला? ती माहिती इस्रायलने दिलेली नाही. पहाटेच्या सुमारास स्फोटाचे आवाज ऐकू आल्याच इराणी मीडियाने म्हटलं आहे. हा फार मोठा हल्ला नसल्याच इराण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण हल्ल्याच स्वरुप स्पष्ट झाल्यास इराणची प्रतिष्ठा धुळीस मिळेल.