iran israel war: ना क्षेपणास्त्र, ना बॉम्ब…इस्त्रायलचा एकच असा वार की इराण हादरला, धोक्यात आला अणूउर्जा प्रकल्प

iran israel cyber war: इस्त्रायलची यंत्रणा सायबर हल्ले करण्यात चांगलीच तरबेज आहे. 14 वर्षांपासून ते या पद्धतीचे हल्ले करत आहेत. नुकताच पेजर हल्ल्यातून इस्त्रायलने दाखवून दिले की त्यांच्याकडे शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची गुप्तचर संस्था मोसादने यापूर्वी अनेक कामगिऱ्या फत्ते केल्या आहेत.

iran israel war: ना क्षेपणास्त्र, ना बॉम्ब...इस्त्रायलचा एकच असा वार की इराण हादरला, धोक्यात आला अणूउर्जा प्रकल्प
iran israel war
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 5:32 PM

iran israel cyber war: इराण आणि इस्त्रायल दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने बदला घेणार असल्याचे म्हटले होते. आता इस्त्रायलने एकही क्षेपणास्त्र डागले नाही. त्यानंतर इराण पूर्ण जायबंदी झाला आहे. इस्त्रायलने पुन्हा एक वेळेस जगाला धक्का बसेल, असे करुन दाखवले आहे. इराणवर इस्त्रायलने सायबर हल्ला केला आहे. या सायबर हल्ल्यामुळे इराणमधील ३० हजार संगणक बंद पडले आहेत. त्यात सरकारी कार्यालयातील संगणक तर आहेत, पण अणूउर्जा प्रकल्पांवरील संगणकसुद्धा आहेत. त्यामुळे इराणचे अणूउर्जा प्रकल्पच धोक्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, इराण सरकारच्या अणुउर्जा प्रकल्पावर सायबर हल्ला झाला आहे. या माध्यमातून इस्त्रायलने इराणच्या अणूउर्जा प्रकल्पातील गोपनीय माहिती मिळवली आहे. इराणच्या सुप्रीम कॉन्सिल ऑफ सायबर स्पेसचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी सांगितले की, सायबर हल्ल्यात इराण सरकारच्या तीन शाखा न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे ३० हजार संगणक ठप्प झाले आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पांसह या ठिकाणी धोका

सायबर हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प, बंदर वाहतूक नेटवर्क, इंधन वितरण प्रणाली आणि नगरपालिका नेटवर्कवर धोका निर्माण झाला आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये एकीकडे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी मैत्री वाढवत होते, तर दुसरीकडे इस्रायल इराणमध्ये सायबर हल्ले करत होते.

अमेरिकेचे ऐकले पण हवे ते करुन दाखवले

इस्त्रायलने आपली बदला घेण्याची धमकी खरी करुन दाखवली आहे. अमेरिकेने इराणचे अणूप्रकल्प आणि इंधन प्रकल्पावर हल्ला न करण्याचे इस्त्रायलला बजावले होते. मग इस्त्रायलने सायबर हल्ले करुन आपली धमकी खरी करुन दाखवली आहे. इस्त्रायलने इराणवर केलेला हा पहिला हल्ला आहे. आता यानंतर इस्त्रायल पुन्हा दुसरा कसा हल्ला करणार? याकडेही लक्ष लागले आहे.

इस्त्रायल सायबर हल्ल्यात तरबेज

इस्त्रायलची यंत्रणा सायबर हल्ले करण्यात चांगलीच तरबेज आहे. 14 वर्षांपासून ते या पद्धतीचे हल्ले करत आहेत. नुकताच पेजर हल्ल्यातून इस्त्रायलने दाखवून दिले की त्यांच्याकडे शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची गुप्तचर संस्था मोसादने यापूर्वी अनेक कामगिऱ्या फत्ते केल्या आहेत.

तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.