Israel – Hamas war : इस्रायल फॉरेन्सिक टीमचा धक्कादायक खुलासा, जगाला बसला धक्का
Israel - Haman war : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत आहे. इस्रायलने आता हमास या दहशतवादी संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे जगातील लोकांना धक्का बसला आहे.
Israel – Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला अकरा दिवस झाले आहेत. पण संघर्ष अजूनही सुरुच आहे. इस्रायलने हमासला संपवण्यासाठी हल्ले वाढवले आहेत. हमासच्या ठिकाणांवर हल्ले करुन नष्ट केले जात आहेत. हमासला या पृथ्वीवरुन नष्ट करुन टाकू असं याआधाची इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. हमासमधील एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाईनकडून यावरुन इस्रायलवर टीका केली जात आहे. आता इस्रायसलच्या फॉरेन्सिक टीमने मृतदेहांची तपासणी केल्यानंतर धक्कादायक खुलासा केला आहे.
इस्रायलच्या फॉरेन्सिक टीमचा आरोप काय
हमासने लोकांना बांधून जिवंत जाळल्याचे इस्रायलच्या फॉरेन्सिक टीमने म्हटले आहे. इस्रायलच्या नॅशनल सेंटर ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये आलेल्या मृतदेहांना अत्यंत दुर्गंधी येत आहे. हमासच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे हे मृतदेह आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यापैकी बहुतेक गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेले लोक आहेत. शेकडो मृतदेह जाळण्यात आले आहेत. फॉरेन्सिक टीमचे सदस्य या मृतदेहांची अतिशय काळजीपूर्वक तपासणी करत आहेत. प्रत्येकाच्या शरीराचे डीएनए नमुने, बोटांचे ठसे आणि दात यांची नोंद ठेवली जात आहे.
हमासने लोकांना बांधून जिवंत जाळले
फॉरेन्सिक सेंटरमधील डॉक्टरांनी स्कॅनरवर इलेक्ट्रिकल केबलने बांधलेली हाडे आणि मांसाचे तुकडे दाखवले आणि ते म्हणाले की हे मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले होते. हे तीन मृतदेह एक महिला, एक पुरुष आणि एका मुलाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना बांधून जिवंत जाळण्यात आले. जेनेटिक आयडेंटिफिकेशन युनिटच्या प्रमुखांनी सांगितले की, 7 ऑक्टोबरपासून आणलेल्या शेकडो मृतदेहांपैकी 500 हून अधिक मृतदेहांची ओळख पटली आहे. आता त्यांच्यावर काय भयंकर अत्याचार झाले असेल हे सांगणे कठीण आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांना एकत्र बांधून जिवंत जाळले.