Israel-Hamas conflict | ‘हे आमचं 9/11, हमासने लहान बाळं, आजी कोणाला सोडलं नाही’ VIDEO
Israel-Hamas conflict | इस्रायल एकालाही नाही सोडणार. 'चुन-चुनके हिसाब होगा'. 'ते कोण आहेत? हे काल सगळ्यांना समजलं'. 'ही सर्व दृश्य डोळ्यांना खुपणारी, विचलित करणारी आहेत" इस्रायलच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने टि्वटरवर प्रथमच लाइव्ह केलं.
जेरुसलेम : हमासने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात क्रूर, भीषण हल्ला केलाय. मागचे 24 तास खूप कठीण होते. हमासच्या हल्ल्यानंतर अभूतपूर्व अशा घटना घडल्या आहेत. इस्रायलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. हमास विरोधात युद्धाची घोषणा केलीय. सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे. “हे आमच 9/11 आहे. त्यापेक्षाही मोठं आहे. इमारतींमध्ये घूसन त्यांनी हत्या केल्या. गाझा पट्टीतील नेचर पार्टीवर हल्ला केला. नागरिकांना लक्ष्य केलं. आजीबाईंना किडनॅप केलं” असं इस्रायलच्या संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. इस्रायल-हमास संघर्षाचा आज तिसरा दिवस आहे. आतापर्यंत 1,100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या बाजूला जास्त मृत्यू झाले आहेत. अनेकांना बंधक बनवण्यात आलय. इस्रायलच खूप मोठ नुकसान या हल्ल्यात झालय.
“आम्ही या हल्ल्याला तसच जोरदार प्रत्युत्तर देणार आहोत. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. हे इस्लामच्या विरोधात आहे. लहान मुलांना त्यांनी सोडलं नाही. हे सर्व समजून घेणं खूप कठीण आहे. हेझबोल्लाह आणि इराण यामध्ये सहभागी होण्याची चूक करणार नाहीत, अशी मी अपेक्षा करतो. आम्ही तयार आहोत” असं इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
Operational update with IDF International Spokesperson Lt. Col. Richard Hecht. https://t.co/9d9JeiUYFG
— Israel Defense Forces (@IDF) October 8, 2023
‘ते कोण आहेत? हे काल सगळ्यांना समजलं’
“अनेक वर्षांपासून आपण हमासबद्दल बोलतोय. ते कोण आहेत, त्यांना काय हवं आहे. इस्रायलयमध्ये त्यांना विद्ध्वंस घडवायचा आहे. ते कोण आहेत? हे काल सगळ्यांना समजलं. त्यांनी आमच्यावर जमीन, पाणी आणि हवेतून हल्ला केला. त्यांनी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं नाही. ते नागरी वस्त्यांवर गेले. त्यांनी मुलं, लहान बाळं, आजी कोणाला सोडलं नाही. ही सर्व दृश्य विचलित करणारी आहेत. त्यांची हल्ल्याची पद्धत खूप क्रूरतेने भरलेली होती” असं इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. इस्रायल-हमास संघर्षात तीन दिवसात 1 हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.