Gaza Hospital Attack | ‘शांत बसणं लज्जास्पद’, मशिदीमध्ये बदल्याची घोषणा, आता आर-पारची लढाई

Israel-Hamas War | गाझामधील रुग्णालयांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धाच सगळ गणितच बदलून गेलय. इस्लामिक जगतात प्रचंड रोष, रागाची भावना आहे. मानवतेवरील हा सर्वात मोठा खुनी हल्ला असल्याच म्हटलं आहे.

Gaza Hospital Attack | 'शांत बसणं लज्जास्पद', मशिदीमध्ये बदल्याची घोषणा, आता आर-पारची लढाई
Gaza Hospital AttackImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 1:06 PM

जेरुसलेम : गाझामधील रुग्णालयांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक देशांमध्ये जबरदस्त आक्रोश आहे. जॉर्डन, बेरूत, तेहरान, सीरिया, जेनिन आणि बगदाद या देशांमध्ये जबरदस्त विरोध प्रदर्शन सुरु आहे. येरूशलममध्ये भीषण गोळीबार सुरु आहे. येरुशलमच्या मशिदीतून चिथावणीखोर घोषणा दिल्या जात आहेत. आता सगळ्यांना युद्धाच्या मैदानात उतराव लागेल, असं मशिदीतून सांगितलं जात आहे. आम्ही आता शांत बसलो, तर ती लाजिरवाणी बाब ठरेल. नागरिकांना नरसंहाराविरोधात एकजूट व्हाव लागेल, अशी जेनिनच्या मशिदीतून घोषणा करण्यात आलीय. रुग्णालयावरील रॉकेट हल्ल्यात एकाचवेळी 500 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे इस्लामिक जगतात प्रचंड रोष, रागाची भावना आहे. रुग्णालयावरील हवाई हल्ल्यानंतर युद्ध अधिक भडकलय. या हल्ल्यानंतर अंकारा, अम्मान, बेरूत, बगदाद येथील इस्रायली दूतावासाबाहेर विरोध प्रदर्शन सुरु आहेत.

जॉर्डनमध्ये सुरक्षापथकं आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडप झालीय. रुग्णालयावरील हवाई हल्ल्यानंतर पॅलेस्टाइनच समर्थन करणारे मिडिल इस्टमधील अनेक देश रागात आहेत. सगळ्याच देशांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केलाय. या गुन्ह्याच इस्रायलला उत्तर द्याव लागेल, असं पॅलेस्टाइनने म्हटलं आहे. इजिप्तने गाझाच्या रुग्णालयावरील इस्रायलच्या हवाई हल्ल्याचा निषेध केलाय. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच थेट उल्लंघन आहे, असं इजिप्तने म्हटलय. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात निष्पाप, निरपराध लोक मारले गेले, असं इराणने म्हटलय. इराणकडून इस्रायलला सतत धमकी दिली जातेय.

‘आम्ही या युद्धासाठी तयार आहोत

मानवतेवरील हा सर्वात मोठा खुनी हल्ला असून हा नरसंहार असल्याच सीरियाने म्हटलय. हे सरळसरळ आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन आहे, असं सौदी अरेबियाने म्हटलय. हा युद्ध गुन्हा आहे, अशी जॉर्डनची भूमिका आहे. आता राग जाहीरपणे व्यक्त करण्याची वेळ आलीय, असं हिजबोलाने म्हटलय. आम्ही या युद्धासाठी तयार आहोत, लोकांना घराबाहेर पडण्याच हिजबोलाने आवाहन केलय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.