Israel Hamas War : इस्रायलसाठी अमेरिका बनली ढाल, हाणून पाडले मिसाईल

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष गेल्या १३ दिवसांपासून सुरु आहे. इस्रायलने हमासवरील हल्ले वाढवले आहेत. पंतप्रधानांनी हमासवरील हल्ले वाढवून त्यांना नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हमासला संपवण्यासाठी इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत.

Israel Hamas War : इस्रायलसाठी अमेरिका बनली ढाल, हाणून पाडले मिसाईल
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 3:19 PM

इस्रायल हमास युद्ध : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अधिक तीव्र झाले आहे. एकीकडे इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेचं मुख्य ठिकाण असलेल्या गाझाला वेढा घातला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवर हिजबुल्लाकडून सातत्याने हल्ले होत आहेत. मात्र अमेरिका इस्रायलवर हल्ला करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आहे. गुरुवारी, अमेरिकन युद्धनौकांनी येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलवर डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हाणून पाडले.

पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी सांगितले की, जमिनीवर हल्ला करणारी क्रूझ क्षेपणास्त्रे आणि अनेक ड्रोन एका विध्वंसकाने अडवले. येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्त्राईलला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ल्याचा प्रयत्न केला.

युद्धनौका यूएसएस कार्नी कार्यरत

इस्रायल आणि हमास या दहशतवादी गटातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गाझा पट्टीत स्थैर्य राखण्यासाठी युद्धनौका यूएसएस कार्नी कार्यरत आहे. हा आदेश खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीचा भाग म्हणून युद्धनौका समुद्रात गस्त घालत आहे. या युद्धनौकेने हौथी बंडखोरांनी प्रक्षेपित केलेले तीन लँड अॅटॅक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि अनेक ड्रोन पाडले.

हल्ल्यात कोणीही जखमी नाही

यात कोणतीही अमेरिकन जीवितहानी झालेली नाही आणि अडवलेली क्षेपणास्त्रे जमिनीवर पडली नाहीत तर पाण्यात पडली. ही क्षेपणास्त्रे कोणाला लक्ष्य करत होती हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु ते येमेनपासून समुद्राच्या उत्तरेकडे सोडण्यात आले. आमच्याकडे प्रदेशातील आमच्या व्यापक हितांचे रक्षण करण्याची आणि इस्रायली नागरिकांवर हमासच्या हल्ल्यापासून सुरू झालेल्या प्रादेशिक तणाव आणि संघर्षाची व्यापक वाढ रोखण्याची क्षमता आहे.”

200 लोकांचे अपहरण

एपी वृत्तसंस्थेनुसार, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये 3,785 लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतेक महिला, मुले आणि वृद्ध आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे 12,500 लोक जखमी झाले असून आणखी 1,300 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचा अंदाज आहे. इस्रायलमध्ये 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश लोक हमासच्या प्राणघातक हल्ल्यात मारले गेलेले नागरिक आहेत. त्याच वेळी, इतर 200 लोकांचे अपहरण करण्यात आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.