Israel Hamas War : युद्धादरम्यान अमेरिकेची इस्रायलसाठी मोठी घोषणा
Irael vs Hamas : हमासने अचानक हल्ला करत20 मिनिटांत 5000 हून अधिक रॉकेट डागली. ज्यामध्ये शेकडो लोकं मरण पावली. इस्रायलने प्रत्युत्तर देत ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले आहे. यानंतर अनेक देश इस्राईलसाठी मदतीची घोषणा करत आहेत. भारताने ही इस्राईलला पाठिंबा दर्शवला आहे.
Israel Hamas War : पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात किमान 250 लोक ठार झाल्याची माहिती आहे. हमासने ऑपरेशन अल अक्सा फ्लडची घोषणा केली आणि 20 मिनिटांत 5000 हून अधिक रॉकेट डागली. इस्राईलमध्ये घुसखोरी करण्यात आली. इस्रायलने प्रत्युत्तर देत ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले. इस्राईलनेही युद्धाची घोषणा केली. यानंतर जगातील अनेक देश इस्रायलच्या पाठिशी उभे राहिले आहे. भारताने देखील इस्राईल सोबत असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आता अमेरिकेनेते इस्राईलसाठी मोठी घोषणा केली आहे.
जो बायडेन यांच्याकडून मदतीची घोषणा
अमेरिकेने इस्रायलसाठी आपत्कालीन लष्करी मदतीची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला 8 अब्ज डॉलरचे आपत्कालीन लष्करी मदत जाहीर केली आहे. हमासच्या अचानक हल्ल्यानंतर संपूर्ण जगावर याचे परिणाम पाहायला मिळणार आहेत. ज्यूंच्या सुट्टीच्या दिवशी शनिवारी हमासने अचानक देशावर रॉकेटने हल्ला केला. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने ५ हजारांहून अधिक रॉकेट डागल्यानंतर अमेरिकेने मदतीची घोषणा केलीये.
रॉकेट हल्ल्यात अनेक लोकं ठार
रॉकेट हल्ल्यात अनेक लोकं मारली गेली आहेत. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, हमासच्या अतिरेक्यांनी अचानक आक्रमण केल्याने 12 तासांनंतर दक्षिण इस्रायलमधील 22 ठिकाणी लढाई सुरू आहे. लष्कराचे मुख्य प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, दक्षिण इस्रायलमध्ये असा कोणताही समुदाय नाही जिथे आमच्याकडे सैन्य नाही. ते म्हणाले की इस्रायलने काही समुदायांवर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे परंतु ते सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी सैन्य अजूनही मोहिम राबवत आहे.
गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या व्यापक हल्ल्यानंतर या भागात किमान 198 लोक मारले गेले आहेत आणि इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल किमान 1,610 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या नॅशनल रेस्क्यू सर्व्हिसने म्हटले आहे की इस्रायलमध्ये हमासच्या व्यापक हल्ल्यात किमान 70 लोक ठार झाले आहेत.