Israel-Hamas War : इस्रायल-हमास युद्धात आणखी एका देशाची एन्ट्री, कोणी पुरवले हमासला शस्त्रे

Israel-hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धात दोन गटात जग वाटले गेले आहे. काही देश छुप्या पद्धतीने हमासला पाठिंबा देत असल्याचं बोललं जात आहे. कोणता आहे तो देश. हमासकडे सापडलेले शस्त्र कोणत्या देशाचे आहेत. कोणी पुरवले हमासला शस्त्रे.

Israel-Hamas War : इस्रायल-हमास युद्धात आणखी एका देशाची एन्ट्री, कोणी पुरवले हमासला शस्त्रे
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 3:33 PM

Israel – Hamas War : इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमास या दशतवादी संघटनेकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले होते. दोन देशांमधील या युद्धात जग दोन गटात वाटले गेले आहे. काही देश इस्रायलच्या सोबत आहेत तर काही देश पॅलेस्टिनला पाठिंबा देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल इस्रायलमध्ये जात जगाला संदेश दिला की ते इस्रायलच्या मागे भक्कमपणे उभा आहे. काही देश हे उघडपणे पाठिंबा देत नसले तरी त्यांचा छुपा पाठिंबा आहे. यामध्ये आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. कारण हमासच्या दहशतवाद्यांनी ज्या शस्त्रांचा वापर केला ते शस्त्र कोणत्या देशाचे होते याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

हमासला शस्त्र पुरवणारा देश कोणता?

हमासच्या दहशतवाद्यांकडे असलेले शस्त्र हे उत्तर कोरियाचे असल्याचं पुढे आलं आहे. इस्रायलने दहशतवाद्यांचे शस्त्र ताब्यात घेतल्यानंतर ही गोष्ट पुढे आली आहे. मात्र, उत्तर कोरियाने दहशतवादी संघटनेला शस्त्रे विकल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

उत्तर कोरियाच्या शस्त्राबाबत तज्ञांनी विश्लेषण केले. हमासने हल्ला करण्यासाठी जे F-7 रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड वापरले. ते उत्तर कोरियाचे असल्याचा आरोप होत आहे. सीरिया, इराक, लेबनॉन आणि गाझा पट्टीमध्ये F-7 आढळले आहे. यावरुन उत्तर कोरियाने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला आहे असा आरोप आता होत आहे.

हमासच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचे फोटो ही प्रसिद्ध केले आहेत ज्यात दहशतवादी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि F-7 सारखी इतर शस्त्रे चालवताना दिसत आहेत.

इस्रायलकडून उत्तर देण्यास नकार

इस्रायली सैन्याने रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडच्या निर्मात्याबद्दल आणि त्याच्या स्त्रोताबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

अमेरिका सारखा देश इस्रायलच्या मागे उभे राहिल्याने अमेरिकेच्या विरोधातील देश साहजिकच शत्रूचा शत्रू आपला मित्र अशा भूमिकेत दिसत आहेत. आखाती देश पण पॅलेस्टिनच्या बाजुने उभे राहिले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.