Israel Hamas War | एक डोळा, एक हातवाला मास्टरमाइंड, त्याच्या एका इशाऱ्यावर घुसले हमासचे दहशतवादी

Israel Hamas War | कोण आहे तो? त्याच्या एका इशाऱ्यावर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घातला हैदोस. इस्रायलच्या हल्ल्यात त्याने त्याचा एक डोळा, दोन पाय आणि एक हात गमावला. पण अखेर त्याने इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा इस्रायलवर घडवून आणला.

Israel Hamas War |  एक डोळा, एक हातवाला मास्टरमाइंड, त्याच्या एका इशाऱ्यावर घुसले हमासचे दहशतवादी
mohammed deif
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 8:31 AM

जेरुसलेम : त्याला एक डोळा नाहीय. एक हात नाहीय. पण, तरीही त्याच्या एका आवाजावर इस्रायलमध्ये आजवरचा सर्वात मोठा हल्ला झाला. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये अक्षरक्ष: हैदोस घातला. यामध्ये आतापर्यंत 900 इस्रायलींचा मृत्यू झाला असून 2600 जखमी झाले आहेत. इस्रायलवर झालेल्या या भीषण हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे, मोहम्मद डेफ. इस्रायलने आजवर अनेकदा मोहम्मद डेफला संपवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी तो निसटण्यात यशस्वी ठरला. आज तोच इस्रायलसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलाय. व्यक्तीगत जीवनात त्याने एक डोळा, दोन पाय आणि हातच नव्हे, तर आपली दोन मुलं, पत्नीला गमावलय. इस्रायलवर झालेल्या या हल्ल्याचा मास्टरमाइंड मोहम्मद डेफच आहे. हल्ला करण्याआधी त्याने दहशतवाद्यांसाठी एक खास संदेश जारी केला होता. गाजाच्या आसपास वायरिंग तोडण्यासाठी स्फोटक आणि बुलडोझरचा प्रयोग करण्याचा आदेश दिला होता.

हमासचा हा म्होरक्या मोहम्मद डेफचा जन्म 1965 साली एका शरणार्थी शिबिरात झाला. त्यावेळी गाझापट्टी इजिप्तच्या नियंत्रणाखाली होती. इस्रायलला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्यानंतर हमास आणि पॅलेस्टाइनमध्ये मोहम्मद डेफ हिरो बनलाय. मागच्या 50 वर्षात इस्रायलवर इतका मोठा हल्ला झाला नव्हता. यापुढेही त्याच्या एका इशाऱ्यावर हमासचे दहशतवादी काहीही करु शकतात. इस्रायलवरील हल्ल्याआधी मोहम्मद डेफचा एक संदेश प्रसारीत करण्यात आला. “आपल्या लोकांवर अन्याय होतोय. पृथ्वीवरील शेवटचा ताबा संपवण्यासाठी सर्वात मोठ्या लढाईचा दिवस आहे. गाझामध्ये मागच्या 16 वर्षांपासून नाकाबंदी, वेस्ट बँकमध्ये इस्रायली छापे, अल अक्सा मशिद हिंसाचाराच हे उत्तर आहे” असं मोहम्मद डेफने त्याच्या संदेशात म्हटलं होतं. कितीवेळा मारण्याचा प्रयत्न?

मोहम्मद डेफ अनेक वर्ष गायब होता. मागच्या दोन दशकापासून इस्रायल त्याला संपवण्याचा प्रयत्न करतय. गुप्तचर संस्था अनेकदा त्याच्यापर्यंत पोहोचल्या. पण त्याला मारु शकल्या नाहीत. त्याच्यावर हल्ल्याचे अनेक प्रयत्न झाले. यात त्याने आपला डोळा, दोन पाय आणि एका हात गमावला. महत्त्वाच म्हणजे त्याचे फक्त दोन फोटो आहेत. एक 30 वर्ष जुन ओळखपत्र इस्रायलने जारी केलय. इस्रायलने आतापर्यंत त्याला पाचवेळा मारण्याचा प्रयत्न केला. 2001, 2001, 2006, 2014 आणि 2021मध्ये मोहम्मद डेफला संपवण्यासाठी वेगवेगळे हल्ले करण्यात आले. पण तो निसटला. एका हल्ल्यात त्याने डोळा गमावला. त्यानंतर दोन पाय, एक हात गमावला. त्याची दोन मुलं आणि पत्नी या हल्ल्यात मारले गेले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.