Israel-Hamas War | हमासच काही खरं नाही, इस्रायलसाठी अमेरिकेच एक खास विमान आणि गेराल्ड आर फोर्ड दाखल
Israel-Hamas War | आता होईल खऱ्या युद्धाला सुरुवात. इस्रायलला शत्रू राष्ट्रांनी घेरलेल आहे. एकाचवेळी इस्रायलला अनेक आघाड्यांवर तोंड द्यायच आहे. त्यामुळे अमेरिका भक्कमपणे इस्रायलच्या पाठिशी उभी आहे.
जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल युद्ध आता आणखी भडकणार आहे. दिवसेंदिवस या युद्धाची भीषणता वाढत जाणार आहे. इस्रायलकडून सध्या गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरु आहेत. आता त्याची तीव्रता आणखी वाढेल. कारण अमेरिकेने इस्रायलला फक्त तोंडी साथ दिलेली नाही, तर अमेरिका अप्रत्यक्षपणे रण मैदानात उतरली आहे. अमेरिकेने युद्धासाठी लागणारी खतरनाक शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पाठवला आहे. अमेरिकन शस्त्र आणि दारुगोळ्याने भरलेलं एक विशेष विमान इस्रायलमध्ये दाखल झालय. त्याचवेळी गेराल्ड आर फोर्ड ही युद्धानौकाही इस्रायल जवळच्या समुद्रात पोहोचली आहे. अत्यंत अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि दारुगोळा विमानातून पाठवण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी या विमानाने अमेरिकेतून उड्डाण केलं होतं. रात्री उशिरा इस्रायलच्या नेबातिम एअर बेसवर या विमानाच लँडिंग झालं. हमासच्या इस्रायलवरील भीषण हल्ल्यानंतर अमेरिकेने आधी निषेध केला. त्यानंतर इस्रायलच समर्थन करत असल्याच जाहीर केलं.
आता अमेरिकेने थेट युद्ध साहित्याचा पुरवठा सुरु केलाय. अमेरिकेहून इस्रायलमध्ये आलेलं हे पहिल विमान होतं. यापुढे सुद्धा अनेक विमान अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेऊन इस्रायलमध्ये दाखल होऊ शकतात. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आज इस्रायलच्या दौऱ्यावर येऊ शकतात. अमेरिकेन नौदलाची घातक यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड इस्रायलच्या मदतीसाठी समुद्रात दाखल झाली आहे. त्याशिवाय टिकोनडेरोगा क्लास गाइडेड मिसाइल क्रूजर यूएसएस नॉर्मंडी, मिसाइल विध्वंसक यूएसएस थॉमस हडनर (डीडीजी 116), यूएसएस रामेज (डीडीजी 61), यूएसएस कार्नी (डीडीजी 64), आणि यूएसएस रूजवेल्ट (डीडीजी 80) आणि आर्ले बर्क क्लास गाइडेड मिसाइलचा सुद्धा इस्रायलच्या मदतीसाठी असतील. सध्या फायटर विमानांचे जे स्क्वाड्रन आहेत, ते वाढवण्यात येणार आहेत.
🇮🇱🤝🇺🇸 The first plane carrying U.S. armaments has since arrived at the Nevatim Airbase in southern Israel this evening.
The cooperation between our militaries is a key part of ensuring regional security and stability in times of war.
— Israel Defense Forces (@IDF) October 11, 2023
म्हणून अमेरिका मैदानात उतरली
इस्रायलसाठी प्रसंगी एफ-15, एफ-16 आणि ए-10 सुद्धा युद्धाच्या मैदानात उतरु शकतात. इस्रायलला शत्रू राष्ट्रांनी घेरलेल आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही या स्थितीचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे अमेरिका मैदानात उतरली आहे. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्या अत्याधुनिक युद्धनौका आणि फायटर जेट्स सज्ज ठेवल्या आहेत.