Israel-Hamas War | गाझामधला तिसरा प्लेयर कोण? ज्याच्या एका चालीने बदलला युद्धाचा खेळ, एकटा पडणार इस्रायल

Israel-Hamas War | या तिसऱ्या प्लेयरमुळे इस्रायल 'चेकमेट' होणार?. गाझा पट्टीतील एका रुग्णालयावर रॉकेट हल्ला झाला. यात एकाचवेळी 500 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सहाजिक इस्रायलबद्दल राग, द्वेष वाढू शकतो.

Israel-Hamas War | गाझामधला तिसरा प्लेयर कोण? ज्याच्या एका चालीने बदलला युद्धाचा खेळ, एकटा पडणार इस्रायल
Israel-Hamas War
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 10:54 AM

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आता तिसऱ्या प्लेयपरची एंट्री झाली आहे. गाझा पट्टीतील अल-अहली हॉस्पिटलवर भीषण रॉकेट हल्ला झाला. यात 500 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास दोघे परस्परांवर आरोप करत आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने हा हल्ला इस्रायलने केल्याच म्हटलं आहे. इस्रायलने हल्ल्याचा आरोप फेटाळून लावलाय. या रॉकेट हल्ल्यामागे पॅलेस्टाइनमधील इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटना असल्याच इस्रायलने म्हटलय. इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेने डागलेल रॉकेट या रुग्णालयावर पडलं, असं इस्रायलच म्हणण आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, “गाझामधून दहशतवाद्यांनी रॉकेटचा वर्षाव केला. रुग्णालयाजवळून ही रॉकेट जात होती. त्यातल्याच एक रॉकेटच टार्गेट चुकलं, रुग्णालयावर झालेल्या या हल्ल्यासाठी इस्लामिक जिहाद जबाबदार आहे”

वर्ष 1981 मध्ये पॅलेस्टाइन इस्लामिक जिहादची स्थापना झाली होती. इजिप्तमध्ये पॅलेस्टाइनमधील विद्यार्थ्यांनी ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती. वेस्ट बँक, गाझासह इस्रायलने बेकायदारित्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशात पॅलेस्टाइनच राज्य स्थापित करणं हा त्यामागे उद्देश होता. पीजेआयला इराणकडून समर्थन मिळतं. तिथेच त्यांना प्रशिक्षण आणि पैशांचा पुरवठा केला जातो. त्याशिवाय शस्त्रास्त्र सुद्धा पुरवली जातात. गाझाच्या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण जगभरातून निषेध होतोय. मध्य पूर्वेतील अनेक देशांनी या हल्ल्याची निंदे केलीय. अमेरकिेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सुद्धा संतापले आहेत. त्यांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केलाय. त्यांनी आपल्या टीमला रिपोर्ट सादर करायला सांगितला आहे. ते इस्रायलनंतर जॉर्डनच्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द झालाय. युद्धाच सगळ गणित बदलेल

इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्ब वर्षाव सुरु आहे. त्यामुळे पहिला आरोप थेट इस्रायलवर होण स्वाभाविक आहे. या हल्ल्यामुळे युद्धाच सगळ गणित बदलेल व इस्रायल एकटा सुद्धा पडू शकतो. “गाझामधील क्रूर दहशतवाद्यांनीच गाझातील हॉस्पिटलवर हल्ला केला. इस्रायली डिफेन्स फोर्सचा याच्याशी काही संबंध नाहीय. ज्यांनी निदर्यतेने आमच्या मुलांची हत्या केली, त्यांनीच स्वत:च्या मुलांना सुद्धा संपवलं” असं बेंजामिन नेतान्याहू यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.