Israel-Hamas War | हमासच्या एरियल फोर्सच्या प्रमुखाचा ‘गेम ओव्हर’, इस्रायलने दिला मोठा दणका

Israel-Hamas War | कधी केलं ऑपरेशन?. कोण होता अबू मुराद? काय केलेलं त्याने?. हमासचे दहशतवादी ग्लायडर्सवरुन दक्षिण इस्रायलमध्ये दाखल झाले होते. जवळपास 5 हजार रॉकेट डागले.

Israel-Hamas War | हमासच्या एरियल फोर्सच्या प्रमुखाचा 'गेम ओव्हर', इस्रायलने दिला मोठा दणका
Israel-Hamas War
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 2:08 PM

जेरुसलेम : गाझा पट्टीत शुक्रवारी रात्री इस्रायलने एअरस्ट्राइक केला. यामध्ये दहशतवादी संघटना हमासचा एक मुख्य लीडर ठार झाला. इस्रायसलमधल्या एका वर्तमानपत्राने हा दावा केलाय. इस्रायली एअर फोर्सने एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख मुराद अबू मुरादला संपवलं. जिथून हमासच्या हवाई हल्ल्याची रणनिती आखली जायची, त्यावरच इस्रायली फोर्सने एअर स्ट्राइक केला. मागच्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून धुमाकूळ घातला. अनेक निष्पाप नागरिकांची हत्या केली. नरसंहार केला होता. अबू मुरादने या दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हमासचे दहशतवादी ग्लायडर्सवरुन दक्षिण इस्रायलमध्ये दाखल झाले होते.

त्याशिवाय हमासने गाझा पट्टीतून एकाचवेळी जवळपास 5 हजार रॉकेट डागले. त्यामुळे इस्रायलची प्रसिद्ध आर्यन डोम यंत्रणाही फेल ठरली. आर्यन डोम गाझा पट्टीतून येणारी रॉकेट हेरुन त्यांना हवेतच संपवते. पण एकाचवेळी इतक्या रॉकेटना रोखणं आर्यन डोमलाही जमल नव्हतं. हमास कमांडो फोर्सच्या वेगवेगळ्या ठिकाणांना इस्रायली एअर फोर्सने लक्ष्य केलं. हेच दहशतवादी 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये घुसले होते. इस्रायलकडून हमासवर सातत्याने हवाई हल्ले सुरु आहेत. गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे.

हमासचे किती दहशतवादी ठार?

हमासने मागच्या शनिवारी इस्रायलवर इतिहासातील भीषण दहशतवादी हल्ला केला. यात शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले. हमासच्या या भीषण हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत 1300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून प्रत्युत्तर म्हणून सुरु असलेल्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत आतापर्यंत 1530 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हद्दीत हमासचे 1500 दहशतवादी ठार झाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.