इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या सर्वोच्च नेत्याचा मृ्त्यू, हिजबुल्लाहने दिली नवी धमकी

इस्रायल सध्या दोन दहशतवादी संघटनांसोबत लढत आहे. पहिला म्हणजे हमास ज्याने इस्रायलवर पहिला हल्ला केला होता. ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे हिजबुल्लाहच्या विरोधात देखील इस्रायलचे युद्ध सुरु आहे. आतापर्यंत हिजबुल्लांच्या प्रमुख पासून अनेक कमांडर इस्रायलने ठार केले आहेत.

इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या सर्वोच्च नेत्याचा मृ्त्यू, हिजबुल्लाहने दिली नवी धमकी
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 8:42 PM

israel-hamas war : लेबनॉनमधील दहशतवादी गट हिजबुल्लाहने शुक्रवारी इस्रायला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायली सैन्याने गाझामध्ये केलेल्या लष्करी कारवाईत हमासचे सर्वोच्च नेते याह्या सिनवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ही लढाई खुप पुढे गेली आहे.’ हमासने त्यांचा सर्वोच्च नेता सिनवार मारला गेल्याची पुष्टी केली. इराणने संयुक्त राष्ट्रात आपल्या सिनवारच्या स्मरणार्थ एक निवेदन जारी केले आहे.  इस्रायलचे मित्र देश असतील किवा गाझामधील लोकं असतील. त्यांना आता आशा आहे की सिनवारच्या मृत्यूमुळे आता हे युद्ध संपेल. परंतु इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सिनवारच्या हत्येची घोषणा करताना सांगितले की, ‘आमचे युद्ध अद्याप संपलेले नाही.’

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी आधी इस्रायलवर हल्ला केला होता. ज्यामध्ये 1200 लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुतांश सामान्य नागरिक होते. तर किमान 250 जणांचे अपहरण करण्यात आले होते. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये हमासच्या विरोधात कारवाई सुरु केली होती. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 42 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यामुळे गाझाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. 90 टक्के लोकं येथून विस्थापित झाले आहेत.

इस्रायलच्या शिन बेट सुरक्षा एजन्सीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, सिनवार हा हमास आणि इतर अतिरेकी गटांचा समर्थक होता आणि गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्त्रायली नागरिक आणि सैनिकांवर हल्ले करण्याची योजना आखत होता.

दरम्यान, हिजबुल्लाहने सांगितले की, इस्रायलविरुद्धचा त्यांचा लढा एका नव्या वळणारवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी नवीन शस्त्रे वापरली आहेत. हिजबुल्लाहने सांगितले की त्यांचे सैनिक आता प्रथमन नवीन प्रकारची अचूक-मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोन घेऊन हल्ले करतील.

हमास आणि हिजबुल्लाहला संपवण्यासाठी इस्रायनले कंबर कसली आहे. ही लढाई त्यांनी सुरु केली असली तरी त्यांचा शेवट आम्हीच करणार असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यामुळे या दोन्ही दहशतवादी संघटनेचा जोपर्यंत अंत होत नाही तोपर्यंत इस्रायल शांत बसणार नसल्याचं दिसत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.