धक्कादायक! मुस्लिम गेट तोडून आत घुसले, एअरपोर्टवर इस्रायलींच्या मॉब लिंचिंगचा प्रयत्न
Isaral-Hamas war | सध्या इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरु आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांबरोबर अनेक निष्पाप नागरिक मारले जात आहेत. लहान मुल या हवाई हल्ल्यात मृत्यूमुखी पडतायत. त्यावरुन जगातील अनेक देशांमध्ये रोष आहे. एका देशात विरोध प्रदर्शनादरम्यान नागरिक गेट तोडून थेट आत घुसले.
मॉस्को : सध्या सगळ्या जगाच लक्ष इस्रायल-हमास युद्धाकडे लागलं आहे. हे युद्ध सुरु असताना जगातील अनेक देशात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ प्रदर्शन सुरु आहे. काही ठिकाणी इस्रायलच्या दूतावासाबाहेर हिंसक विरोध प्रदर्शन झाली आहेत. पण जे रशियामध्ये घडलं, तसा विरोध अजूनपर्यंत कुठेही झालेला नाहीय. रशियाच्या दागेस्तान प्रांतातील मखाचकला एअरपोर्टवर जमावाने इस्रायली नागरिकांवर हल्ला केला. इस्रायलींच मॉब लिचिंग करण्याचा प्रयत्न झाला. प्रदर्शन करणाऱ्यांना जशी माहिती मिळाली की, तेल अवीवरुन एक विमान येतय, जमावाने रनवेवरच विमानाला घेरलं. हजारो मुस्लिम एअरपोर्टचा गेट तोडून आत घुसले. परिस्थिती इतकी बिघडली की, दंगेखोरांना रोखण्यासाठी स्पेशल फोर्स बोलवावी लागली.
जमावाच्या हातात पॅलेस्टाइनचे झेंडे होते. लहान मुलांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, अशा घोषणा जमावाकडून दिल्या जात होत्या. विमानात जे प्रवासी होते, त्यात ज्यूंचा शोध जमावाकडून सुरु होता. जमावाकडून प्रत्येक प्रवाशाचा पासपोर्ट चेक केला जात होता. या मोठ्या विरोध प्रदर्शनामुळे काहीवेळासाठी एअरपोर्ट बंद करावा लागला. रशियात हमासची बैठक झाली. त्यानंतर तीन दिवसांनी इस्रायलविरोधात हे मोठ विरोध प्रदर्शन झालं. रशियाच्या दागेस्तानमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने राहतात. गोळीबार झाला का?
या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रशियाला सूचित केलय. नेतन्याहू यांनी ज्यू विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले तात्काळ रोखण्याची मागणी केलीय. इस्रायलने रशियाच्या राजदूताला बोलवून इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. रशियातील इस्रायली राजदूत क्रेमलिनच्या संपर्कात आहेत. मॉस्कोमध्ये हमासच्या प्रतिनिधींची बैठक झाली. ते इस्रायलला अजिबात आवडलेलं नाही. दागेस्तान एअरपोर्टवर ही घटना घडली, त्यावेळी तिथे एक हेलिकॉप्टर सुद्धा होतं. रिपोर्ट्सनुसार जमाव तिथे असताना गोळीबाराचा आवाज सुद्धा ऐकू आला.