Israel-Hamas War | Air Strike मध्ये 500 जण ठार झाल्याच्या आरोपावर इस्रायलने काय म्हटलं?

Israel-Hamas War | गाझा पट्टीतील हॉस्पिटलवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला. गाझा पट्टीत इस्रायली एअर फोर्सकडून एअर स्ट्राइक सुरु आहेत. गाझा पट्टीतील अनेक जखमी उपचारासाठी या रुग्णालयात दाखल होते.

Israel-Hamas War | Air Strike मध्ये 500 जण ठार झाल्याच्या आरोपावर इस्रायलने काय म्हटलं?
Israel-Hamas War
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 8:14 AM

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल युद्ध थांबण्याऐवजी वाढत चालल आहे. दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूला 4500 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमासमधील संघर्ष आता अधिक तीव्र होऊ शकतो. गाझाच्या हॉस्पिटलवर झालेल्या मिसाइल हल्ल्यात एकाचवेळी 500 नागरिकांचा मृत्यू झालाय. हमास या दहशतवादी संघटनेने रात्री उशिरा ही माहिती दिली. हमासने इस्रायलवर एअर स्ट्राइकचा आरोप केलाय. पण इस्रायलने हा आरोप फेटाळून लावला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायल घुसून भीषण हल्ला केला. मानवतेच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या. या हल्ल्यात इस्रायलच्या 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ला झाला त्या दिवसापासून इस्रायलने गाझा पट्टीमध्ये बॉम्ब हल्ले सुरु केले आहेत. गाझा पट्टीत इस्रायली एअर फोर्सकडून एअर स्ट्राइक सुरु आहेत. आज युद्धाचा 11 वा दिवस आहे. दरम्यान आता हॉस्पिटलवरील हल्ल्यामुळे या युद्धाला वेगळ लागू शकत.

गाझा पट्टीतील हॉस्पिटलवरील हल्ल्यात एकाचवेळी 500 जणांचा मृत्यू झाला आहे. आता यावरुन इस्रायल आणि हमासमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. इस्रायलने त्यांच्यावर झालेला आरोप फेटाळून लावलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी उत्तर दिलय. “संपूर्ण जगाला माहित असलं पाहिजे, गाझामधील क्रूर दहशतवाद्यांनीच गाझातील हॉस्पिटलवर हल्ला केला. इस्रायली डिफेन्स फोर्सचा याच्याशी काही संबंध नाहीय. ज्यांनी निदर्यतेने आमच्या मुलांची हत्या केली, त्यांनीच स्वत:च्या मुलांना सुद्धा संपवलं” असं बेंजामिन नेतान्याहू यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. त्या रुग्णालयाच नाव काय?

इस्रायली सैन्याने या हल्ल्यासाठी इस्लामिक जिहादला जबाबदार धरलय. IDF ने सांगितलं की, “शत्रूकडून इस्रायलवर अनेक रॉकेट्स डागण्यात आले होते, ज्यातील एक रॉकेट दिशा भरकटून गाझाच्या रुग्णालयावर पडलं” आमच्याकडे गोपनीय माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार, रॉकेट हल्ल्यासाठी इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. गाझा पट्टीतील अल अहली रुग्णालयावर हा रॉकेट हल्ला झालाय. इस्रायली एअरफोर्सने मंगळवारी रात्री अल अहली बापटिस्ट रुग्णालयावर एअर स्ट्राइक केला, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालायचा दावा आहे. गाझा पट्टीतील अनेक जखमी उपचारासाठी या रुग्णालयात दाखल होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.