Israel-Hamas war | जमिनीवरच्या आर-पारच्या लढाई संदर्भात इस्रायली आर्मीकडून महत्त्वाची माहिती
Israel-Hamas war | गाझामध्ये इस्रायली आर्मी कधी घुसणार?. हमासने जे केलय त्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असं इस्रायलने जाहीर केलय. इस्रायलची पुढची Action काय असणार?
जेरुसलेम : इस्रायलने हमास विरोधात युद्ध पुकारलं आहे. हमासने इतिहासातील सर्वात मोठा हल्ला केल्यानंतर इस्रायलने हे पाऊल उचललय. इस्रायलने सुरु केलेल्या युद्धाच स्वरुप अजून तरी मर्यादीत आहे. इस्रायल सध्या फक्त बॉम्ब फेक करतोय. फायटर जेट्समधून गाझा पट्टीत इस्रायलकडून बॉम्बफेक सुरु आहे. यातही मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होत आहे. हमासने शनिवारी इस्रायलवर जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही मार्गांनी हल्ला केला. इस्रायलने अजून तरी जमिनी आणि समुद्री मार्गे कारवाई सुरु केलेली नाहीय. इस्रायलकडून सध्या फक्त एअर फोर्सचा वापर सुरु आहे. इस्रायलने अजून आपल्या पायदळाचा वापर केलेला नाही. गाझा पट्टीच्या सीमेवर इस्रायली सैन्य जमा झालय. रणगाडे सज्ज आहेत. पण अजून ऑर्डर आलेली नाही. इतक्या मोठ्या हल्ल्यानंतर इस्रायल शांत बसणार नाही. गाझा पट्टीत घुसून ते कारवाई करतील, असा अंदाज आहे.
गाझा पट्टीत इस्रायली सैन्य कधी घुसणार? या बद्दल विविध तर्क-विर्तक सुरु असताना आता इस्रायली आर्मीकडून या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. “ग्राऊंड ऑपरेशन्सची आम्ही तयारी करतोय, पण देशाच्या राजकीय नेत्यांनी या बद्दल निर्णय घेतलेला नाहीय” अशी माहिती लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच यांनी पत्रकारांना दिली. निर्णय़ झाला, तर सैन्य गाझा पट्टीत घुसून कारवाई करेल. इस्रायलने त्यांच 3 लाख 60 हजारच सैन्य जमवलं आहे. हमासने जे केलय त्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असं इस्रायलने जाहीर केलय. त्यामुळे इस्रायलची पुढची Action काय असणार? या बद्दल विविध तर्क-वितर्क सुरु आहेत. 40 बाळांचा शिरच्छेद
हमासचे दहशतवादी शनिवारी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तपात, नरसंहार केला. लहान बाळं, मुलं, वयोवृद्ध नागरिक कोणाला सोडलं नाही. गाझा पट्टीपासून जवळ असलेल्या इस्रायलच्या एका शहरात नरसंहार केला. 40 बाळांचा शिरच्छेद केला. घरात घुसून अनेक कुटुंब संपवली. हमासच्या दहशतवाद्यांनी जो अत्याचार केला, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. अमेरिकेने सुद्धा आपल्या युद्धा नौका, फायटर विमान तसच दारुगोळा इस्रायलसाठी पाठवून दिला आहे. हे सर्व पुढच्या घनघोर लढाईचे संकेत आहेत.