Israel-Hamas War | ‘आज शुक्रवार तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल असा….’, आज काहीतरी मोठ घडणार?
Israel-Hamas War | इस्रायल आणि हमासमधील युद्ध खूप भीषण झालय. हमासने इस्रायलला नवीन धमकी दिलीय. ऑपरेशन अल अक्सानंतर हमासने आता फ्राइडे अल अक्सा ऑपरेशनची घोषणा केलीय.
जेरुसलेम : प्रत्येक तासागणिक इस्रायल आणि हमासमधील युद्ध भीषण होत चाललय. गाझा पट्टीत इस्रायलकडून सातत्याने हवाई हल्ले सुरु आहेत. आता सीरियातील दोन एअरपोर्ट इस्रायलच्या फायटर विमानांच्या टार्गेटवर आहेत. दमिश्क आणि अलेप्पो विमानतळावर इस्रायलकडून बॉम्बवर्षाव करण्यात आला. इराणकडून हिजबोला या दहशतवादी संघटनेला शस्त्र मिळतायत, तो पुरवठा रोखण्यासाठी इस्रायलकडून हा हवाई हल्ला करण्यात आला. इस्रायली एअरफोर्सने आतापर्यंत हमासच्या ठिकाणांवर 6000 बॉम्ब टाकले आहेत, इस्रायली सैन्याकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान आता हमासने इस्रायलला धमकी दिली आहे. इस्रायलच मोठं नुकसान करण्यासाठी 15 पॉइंटचा प्लान तयार केलाय. ऑपरेशन अल अक्सानंतर हमासने आता फ्राइडे अल अक्सा ऑपरेशनची घोषणा केलीय.
हमासच्या दहशतवाद्यांनी टीव्हीसाठी एक व्हिडिओ मेसेज जारी केलाय. गाझामध्ये इस्रायलने लहान मुल आणि महिलांची हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी मोठा हल्ला करण्यात येईल. इस्रायलने स्वप्नातही विचार केला नसेल, असा बदला शुक्रवारी घेणार अशी धमकी हमासने दिली आहे. हमासच्या अल-कुद्स ब्रिगेडने जेरूसलम, डोडो, बेर्शेबा, अश्कलोन, नेटिवोट आणि सेडरोटवर 130 मिसाइल डागण्याची धमकी दिली आहे. इस्रायलला बर्बाद करण्यासाठी आणि अल अक्सा मशिदीवरील त्यांचा बेकायद ताबा संपवण्यासाठी 15 पॉइंट्सचा प्लान तयार केला आहे. आम्ही आधीच अल अक्सा ऑपरेशनने इस्रायलला धक्का दिलाय. आता हमासने इस्रायलला शुक्रवारच्या फ्राइडे अल अक्सा ऑपरेशनसाठी तयार राहण्याचा इशारा दिलाय. इस्रायलवर रॉकेट डागले
आम्हाला हिंसा मान्य नाही, असं पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती अब्बास यांनी हमासच्या हल्ल्यावर म्हटलं आहे. नागरिकांना मारणं किंवा दोन्ही बाजूकडून नागरिकांचा छळ होत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही असं अब्बास यांनी म्हटलय. लेबनॉन आणि सीरियाने वेळोवेळी हमासची मदत केली आहे. मागच्या काही दिवसांपासून हिजबोल ही दहशतवादी संघटना सुद्धा इस्रायल विरोधात चिथावणीखोर कृत्य करत आहे. मे 2021 मध्ये लेबनॉन, सीरिया आणि इराकडून इस्रायलवर हल्ला करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातील लेबनॉनकडून इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले होते.