Israel-hamas war : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांना फोन

Israel - hamas war : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांमथ्ये काय चर्चा झाली याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी शोक व्यक्त केला. दोघांमध्ये काय चर्चा झाली वाचा.

Israel-hamas war : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांना फोन
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 10:22 PM

Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या १२ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. हमासने युद्ध सुरु केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढत चालला आहे. त्यातच काल गाझाच्या अल अहली रुग्णालयात हल्ल्यामुळे शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. नागरिकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आम्ही पॅलेस्टिनी लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहू असे पीएम मोदी यांनी निवेदनात म्हटले आहे. यासोबतच त्यांनी हिंसाचार, दहशतवाद आणि प्रदेशातील ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थिती यावर चिंता व्यक्त केली. इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम म्हणाले होते की, पॅलेस्टाईनबाबत भारताचे धोरण दीर्घकाळापासून सारखेच आहे. भारत नेहमीच संवादातून स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टाईनचा पुरस्कार करत आला आहे. भारतालाही इस्रायलमध्ये शांतता हवी आहे.

पंतप्रधान मोदींची पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ट्विट केले की, “पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बोललो. गाझाच्या अल अहली रुग्णालयात नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

आम्ही पॅलेस्टिनी लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहू. दहशतवाद, हिंसाचार आणि प्रदेशातील ढासळत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पुनरुच्चार केला.

गाझा येथील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त

पीएम मोदींनी गाझा येथील रुग्णालयावरील हल्ल्यात लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. दु:ख व्यक्त करताना ते म्हणाले होते की, संघर्षात नागरिकांचा मृत्यू होणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर जबाबदारी निश्चित करावी.

गाझा येथील रुग्णालयावरील हल्ल्याचा जागतिक पातळीवरील नेत्यांनी निषेध केला आणि या संदर्भात हस्तक्षेप करून जबाबदारी निश्चित करण्यासाठी चर्चा झाली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.