Israel-Hamas युद्धामुळे जगाच्या वाढल्या चिंता, इस्रायल मोठ्या संकटात

Israel palestine war : इस्रायल आणि हमास संघटना यांच्यातील संघर्ष काही संपत नाहीये. पण हा संघर्ष सुरु असताना इस्रायलसाठी आणखी एक धोक्याची घंटा आहे. चारही बाजुंनी शत्रूंना वेढलेला हा देश आणखी संकटात येऊ शकतो. आता संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागले आहे की, हे युद्ध आणखी वाढू नये.

Israel-Hamas युद्धामुळे जगाच्या वाढल्या चिंता, इस्रायल मोठ्या संकटात
israel pm
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 4:16 PM

Israel Hamas War Update : इस्रायल-हमास मधील संघर्ष अजून संपलेला नाही. गाझा पट्टीला ताब्यात घेण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायलने रणनिती आखली आहे. हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवर लढाई होणार आहे. इस्रायलने गाझामधील हमासचे 750 लष्करी तळ नष्ट केले होते. तीन लाख सैन्य इस्रायलकडून तयार ठेवण्यात आलं आहे. इतकं असून देखील ही लढाई इस्रायलसाठी सोपी नसणार आहे. कारण हा लढा केवळ हमासशीच नाही तर इस्रायलच्या इतर शत्रूंसोबत देखील होणार आहे. इस्रायलच्या सीमांना सर्व बाजूंनी धोका आहे. लेबनॉनमध्ये देखील युद्धाचे वातावरण आहे.

आणखी एक दहशतवादी संघटना सक्रीय

लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्ला देखील या संघर्षात उडी घेण्यास उत्सुक आहे. हमासप्रमाणे या संघटनेलाही इराणचा पाठिंबा आहे. ती सध्या हमासला मदत करत आहे. सध्या ही संघटना फक्त सीमेवर आहे, पण ती कधीही युद्धात उतरू शकते. इस्रायलला याचा देखील धोका आहे. हे त्यांना देखील चांगले माहित आहे. हे युद्ध कधीही सुरु होऊ शकते. लेबनॉनमध्येही नुकतीच पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.

हमासला संपवण्यासाठी इस्रायलकडून हल्ले

इस्रायलने अरब देशांना अनेकदा पराभवाची धूळ चारली आहे. असं असताना देखील इस्रायलसाठी हे युद्ध सोपे नसणार आहे. कारण यामध्ये मोठी जीवीतहानी तसेच संपत्तीचा नाश होतो. हे आव्हान जगापुढे देखील असणार आहे. कारण या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होणार आहे. युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

इस्रायल हमासला संपवल्याशिवाय माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. इस्रायलने हवाई हल्ले करून सीरियातील दोन प्रमुख विमानतळ उद्ध्वस्त केले. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराचा सीरियावरील हा पहिलाच हवाई हल्ला होता. इस्रायलच्या हल्ल्यानंतर विमानतळांवर उड्डाणे थांबवावी लागली. सीरिया सध्या अशांत आहे. मुस्लीम देश इस्रायलला चिथावणी देत आहे.

चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला देश

इस्रायल चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला देश आहे. इराण या युद्धात पडला तर तिसरे महायुद्ध सुरु होऊ शकते. या संघर्षामुळे जग दोन गटात विभागला गेलाय. काही जण इस्रायल तर काही जण पॅलेस्टाईनकडून निदर्शने करत आहेत. लोकं रस्त्यावर उतरले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही इस्रायलला इशारा दिला आहे. या लढाईत इतर कोणत्याही देशाने उडी घेतली तर त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. रशियासोबतच्या युद्धात युक्रेनला जशी साथ दिली तशीच अमेरिका या युद्धात इस्रायलला साथ देत आहे.

हमास-इस्रायल युद्धामुळे जगाच्या चिंता वाढल्या

7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षा चक्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हमासकडून पुन्हा कधीही हल्ला होऊ शकतो. हे युद्ध अजून संपलेले नाही.  हमासचे दहशतवादी अजूनही घातपाताची वाट पाहत आहेत. पण जर इतर देश या युद्धात सहभागी झाले तर मग जगाचे चित्र काही वेगळे असू शकते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.