Israel-Hamas war | सर्वात मोठं चॅलेंज, स्पेशल ऑपरेशनसाठी इस्रायलची ‘सायरेट मटकल’ Ready
Israel-Hamas war | 'सायरेट मटकल' काय आहे?. यूकेची स्पेशल एअर सर्व्हीस किंवा SAS च्या धर्तीवर 'सायरेट मटकल'ची निर्मिती झाली आहे. याआधी 'सायरेट मटकल'ने जगाला थक्क करुन सोडणारा पराक्रम दाखवलाय.
जेरुसलेम : हमासने हल्ला केला, त्याच दिवसापासून इस्रायलने हमास विरोधात कारवाई सुरु केली आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने हवाई हल्ले सुरु आहेत. हमासच्या तळांना लक्ष्य केलं जातय. युद्धात इस्रायलच पारड जड आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत इस्रायलसमोर एक मोठ आव्हान आहे. त्यातून इस्रायल कसा मार्ग काढणार? याकडे जगाच लक्ष लागलं आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी हल्ला केला. त्यावेळी ते दक्षिण इस्रायलमधून अनेकांना बंधक बनवून आपल्यासोबत घेऊन गेले. जवळपास 100 किेवा त्यापेक्षा जास्त इस्रायली नागरिक हमासच्या कैदेत आहेत. या सगळ्यांची सुटका करण्याच इस्रायलसमोर चॅलेंज आहे. सध्या इस्रायलने हमास विरोधात जो आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यावरुन ते हमासची कुठली चर्चा करतील असं वाटत नाही. हमासने आपल्या काही मागण्या मान्य करुन घेण्यासाठी इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलय. सध्याच्या परिस्थिती इस्रायल हमाससोबत कुठलीही चर्चा करणार नाही, हे स्पष्ट आहे.
त्यामुळे हमासच्या ताब्यात असलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी ‘सायरेट मटकल’ तयार आहे. एका ब्रिटिश वर्तमानपत्राने ही माहिती दिलीय. ‘सायरेट मटकल’ ही इस्रायलची स्पेशल एलिट कमांडो युनिट आहे. आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक रेसक्यु मिशनसाठी ‘सायरेट मटकल’ युनिट तयार आहे. यावेळी पॅलेस्टाइनमध्ये घुसून हे काम कराव लागणार आहे. कदाचित खाली बंकरपर्यंत त्यांना जाव लागेल. हे ऑपरेशन सोप नसेल. याआधी ‘सायरेट मटकल’ने जगाला थक्क करुन सोडणारा पराक्रम दाखवलाय. आता सुद्धा ते अशीच कामगिरी करणार का? हे लवकरच समजेल. हमासने शनिवारी जमीन, हवाई आणि समुद्र मार्गाने इस्रायलवर हल्ला केला. त्यांनी 100 इस्रायली नागरिकांना बंधक बनवून नेलं. गाझा पट्टी हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. त्यामुळे इथे ऑपरेशन सोप नसेल. ‘सायरेट मटकल’च्या नावावर मोठा पराक्रम
‘सायरेट मटकल’ शत्रुच्या प्रदेशात खोलवर घुसून माहिती गोळा करते. परदेशात ज्या इस्रायली नागरिकांना बंधक बनवल जातं त्यांच्या सुटकेची जबाबदारी ‘सायरेट मटकल’ युनिटवर असते. यूकेची स्पेशल एअर सर्व्हीस किंवा SAS च्या धर्तीवर ‘सायरेट मटकल’ची निर्मिती झाली आहे. स्पेशल एअर सर्व्हीस हे ब्रिटीश सैन्याच स्पेशल कमांडो युनिट आहे. त्यांनी लंडनच्या इराण दूतावासात घुसून बंधक बनवलेल्या नागरिकांची सुटका केली होती. 1980 मध्ये ‘सायरेट मटकल’ने ऑपरेशन एंटेबे केलं होतं. त्यावेळी इस्रायलच्या या युनिटने युगांडामध्ये जाऊन 103 ज्यू नागरिकांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली होती.