Israel-hamas war: हमासला संपवल्याशिवाय माघार नाही, अमेरिकेचे परराष्ट्रमत्री पुन्हा इस्रायलमध्ये
Israel-palestine conflict: इस्रायलने हजारो पॅलेस्टिनींना शुक्रवारी गाझाला परत पाठवले. इस्रायलने गाझाला चारही बाजुने वेढा घातला आहे. त्यामुळे आता हमासवर हल्ले करण्याची कोणतीही संधी इस्रायल सोडणार नाही, हमासला संपवल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे इस्रायलने आधीच स्पष्ट केले आहे.
Israel-Hamas War : हमासच्या प्रत्येक ठिकाणांना इस्रायलकडून लक्ष्य केले जात आहे. जोपर्यंत हमासचा खात्मा होत नाही तो पर्यंत युद्ध सुरुच राहिल अशी घोषणा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली आहे. त्यामुळे गाझावर सतत इस्रायलकडून हल्ले वाढत आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा लढा आपल्या स्वाभिमानाचा असल्याचे म्हटले आहे. हमासचा नायनाट केला नाही तर तो आमच्यावर हल्ले सुरुच ठेवेले असं इस्रायलने म्हटले आहे. तर इस्रायलला आमच्या भूमीवर स्थान नाही, असे हमासच्या एका नेत्याने म्हटले होते.
गाझाला इस्रायलने चारही बाजुने घेरले
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, हमासने केलेल्या हल्ल्यानंतर स्वसंरक्षणार्थ सुरू झालेला हा लढा आहे. गाझा पट्टीवरील हमासचे नियंत्रण संपवणे हे इस्रायलचे ध्येय आहे.
इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धाची घोषणा केली होती. आज २७ दिवस झाले तरी हा संघर्ष सुरु आहे. हमासवर चारही बाजुने हल्ले करण्यासाठी गाझाला चारही बाजुने इस्रायलने घेरले आहे.
हमासच्या एका नेत्याने मुलाखत देताना म्हटले होते की, इस्रायलला आमच्या भूमीवर स्थान नाही. आम्हाला त्यांना संपवायचे आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन इस्रायलमध्ये
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री शुक्रवारी पुन्हा एकदा तेल अवीव येथे पोहोचले आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांची तेल अवीवची ही तिसरी भेट आहे. आपल्या दौऱ्यात अँटोनी ब्लिंकन इस्रायलच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. इस्रायलनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉर्डनला भेट देणार आहेत. इस्रायलला पोहोचल्यानंतर अँटोनी ब्लिंकन यांनी पुन्हा एकदा इस्रायलला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे प्रत्युत्तर
7 ऑक्टोबर रोजी हमासने अचानक केलेल्या क्रूर हल्ल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलमध्ये अनेकांना ठार करणाऱ्या हमासला संपवण्याचं निर्धार इस्रायलच्या सैन्याने केला आहे. हमासने अनेक नागरिकांना ओलीस बनवून आपल्यासोबत नेले होते. हमासच्या हल्ल्यात जवळपास 1400 इस्रायली लोक मारले गेले.