Israel vs Hamas War : इस्रायलने गाझामधील हमासच्या 200 हून अधिक स्थानांवर क्षेपणास्त्रांनी मारा केलाय. या भीषण हल्ल्यानंतर हमासचे कंबरडे मोडले आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अनेक इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान इस्रायल संरक्षण दलाने दावा केला आहे की, आतापर्यंत 1500 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी इस्रायलने गाझा सीमा पूर्णपणे ताब्यात घेतली आणि सुरक्षित केली असल्याचा ही दावा करण्यात आला आहे. ही तीच सीमा आहे जिथे हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे 20 ठिकाणांहून घुसखोरी करून रॉकेट डागून नागरिकांवर गोळीबार केला होता.
This is the scene that Palestinians in #Gaza woke up to this morning after a long night of relentless Israeli bombing of densely-populated neighborhoods.
The Israeli forces are taking revenge on Palestinian armed factions by committing mass killing crimes against civilians. pic.twitter.com/nfy3taojBL
— Euro-Med Monitor (@EuroMedHR) October 10, 2023
शनिवारी, 7 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे पॅलेस्टाईनमधील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर सुमारे 5000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर दहशतवादी इस्रायलच्या परिसरात घुसले आणि नागरिकांवर गोळीबारही केला. दहशतवाद्यांनी अनेक कुटुंबांना बंधक बनवून आपल्यासोबत नेले. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल युद्धाची घोषणा केली. शनिवारी संध्याकाळपासून जल, जमीन आणि हवा अशा तिन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले केले जात आहेत.