Israel – Hamas War : नुखबा फोर्स काय आहे, इस्रायल सैन्य ज्यांना शोधून शोधून ठार करतेय
Israel - hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अजूनही सुरुच आहे. हमासने सुरु केलेले युद्ध आम्ही संपवू असं इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं. त्यानंतर इस्रायलकडून हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. नुखबा फोर्सच्या दहशतवाद्यांना शोधून शोधून ठार केले जात आहे.
Israel – Hamas war : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन मधील दहशतवादी संघटना हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला बारा दिवस झाले आहेत. इस्रायली संरक्षण दल IDF ने 12 ऑक्टोबर रोजी सांगितले की त्यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या एलिट कमांडो विंग नुखबा फोर्सवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करत घुसखोरी केली. यावेळी त्यांनी अनेक नागरिकांचा जीव घेतला. नुखबाचे दहशतवादी नागरिकांना ठार करत होते. जेव्हा ते युद्धासाठी मैदानात उतरतात तेव्हा ते आपल्या कमांडरच्या आदेशाचेही पालन करत नाहीत. काय आहे हे नुखबा फोर्स?
इस्रायलवर हल्ला झाला तेव्हा हमासचे सशस्त्र दल, इस अल-दिन अल-कासम ब्रिगेडची भूमिका मोठी होती. या सशस्त्र दलाची सर्वात प्राणघातक शाखा म्हणजे नुखबा फोर्स. नुखबा फोर्सने यापूर्वीही इस्रायलविरुद्ध युद्ध केले आहे. हमासचे हे विशेष दल कोणत्याही देशाच्या लष्करापेक्षी कमी नाही. या दलाला देशाच्या लष्करासारखे प्रशिक्षण दिले जाते. नुखबा दलातील सैनिकांची भरती प्रक्रिया अत्यंत अवघड असते.
नुखबा म्हणजे आहे?
नुखबा फोर्सचे नाव ‘अल-नुख्बा’ वरून घेतले आहे. अरबी भाषेत याचा अर्थ ‘उदात्त’ असा होतो. नुखबा फोर्स एक एलिट फोर्स आहे, ज्याला हमासच्या वरिष्ठ नेतृत्वाने निवडलेल्या शीर्ष दहशतवाद्यांमध्ये स्थान दिले आहे. नुखबा फोर्सचे कमांडोही हमासच्या वरिष्ठ नेतृत्वाचे संरक्षण करतात. या दहशतवाद्यांना घुसखोरी आणि हल्ले यासह सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि स्नायपर वापरण्यात या ते नैपुण्य आहे. नुखबा फोर्सेस हे हमासची लष्करी शाखा इझ अल-दिन अल-कासम ब्रिगेडच्या श्रेणीतील लढाऊ युनिटचा भाग आहेत.
नुखबा सैनिकांची भरती कशी केली जाते?
हमास फक्त त्याच्या सुरक्षा संघटनेसाठी इज्ज अल-दीन अल-कासम ब्रिगेड्ससाठी भरती करते. मग सर्वात प्राणघातक लढवय्ये वेगळे केले जातात. त्यानंतर निवड झालेल्या लढवय्यांना देश-विदेशात प्रशिक्षण दिले जाते. नुखबा फोर्सचे सैनिक स्फोटके हाताळण्यात, आधुनिक शस्त्रे वापरण्यात आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात पटाईत आहेत. एवढेच नाही तर नुखबा फायटर पाण्याखाली शत्रूशी लढण्यास सक्षम आहेत. साहजिकच यासाठी त्यांना स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाते.