Iran vs Israel : इराणने बदला घेईपर्यंत इस्रायलकडून दुसरा भीषण स्ट्राइक, जिव्हारी लागणारा वार
Iran vs Israel : इस्रायलने इराणमध्ये घुसून हमास चीफला संपवलं. आम्ही याचा बदला घेऊ असं इराणने जाहीर केलं. पण अजूनपर्यंत इराणला काहीही करता आलेलं नाही. इराण काय करणार याची प्रतिक्षा असतानाच इस्रायलने दुसरा वार केला आहे.

इस्रायलने शुक्रवारी रात्री हमस आणि हमाच्या आसपासच्या चार सैन्य तळांवर आणि इराणी क्रांतिकारी गार्ड कोरच्या (IRGC) कुद्स फ़ोर्सवर हवाई हल्ला केला. इराण समर्थित गटांच्या शस्त्रास्त्र डेपोंना लक्ष्य केलं. या हल्ल्यात तीन इराण समर्थकांचा मृत्यू झाला आहे. दहा जखमी झाले आहेत. UK च्या सीरियाई ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सनुसार, या हल्ल्यामध्ये हमाच्या उत्तर-पश्चिमेला असलेला शस्त्रास्त्र डेपो, ब्रिगेड 47 च कमांड सेंटर आणि माराआन डोंगरावर डिफेन्स सुविधा होती. कुद्स फोर्सच्या IRGC सदस्यांसह ईरान समर्थित सीरियाई आणि बिगर सीरियाई बंडखोर तैनात होते.
इस्रायली सैन्याने होम्स रिफानरीच्या पश्चिमेला हिजबुल्लाच्या सीरियाई दहशतवाद्यांच्या फ्यूल डेपोला टार्गेट केलं. त्याशिवाय माराआन डोंगराच्या दक्षिणेला एका सेंटरवर हल्ला केला. इराण समर्थित रॅपिड रिस्पॉन्स ग्रुपच कमांड सेंटर होतं. त्यालाही टार्गेट केलं.
एयर डिफेंस सिस्टमने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं, पण….
हमा हवाई तळावर तैनात एयर डिफेंस सिस्टमने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं. पण इस्रायली क्षेपणास्त्र रोखता आली नाहीत. शस्त्रास्त्र डेपो आणि फ्यूल टँक नष्ट झाला. डेपोला आग लागली. सीरियाची राज्य समाचार एजन्सी SANA ने इस्रायली हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्यात ‘सात नागरिक जखमी झाले असून नुकसान झालय’
कधीपासून सुरु आहेत इस्रायली हल्ले
2013 पासून इस्रायलने सीरियामधील कुद्स फोर्सच्या IRGC आणि इराण समर्थित प्रॉक्सी गटांवर हल्ले केले आहेत. नेहमीच सैन्य तळांना या हल्ल्यात प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आलय. शस्त्रास्त्र डेपोवर सुद्धा हल्ले करण्यात आले आहेत. सीरियामधील उपस्थिती कमी करण्यासाठी हे हल्ले केल्याच इस्रायलने सांगितलं. अलीकडच्या वर्षात या हल्ल्यांच प्रमाण वाढलं आहे.
इराणच्या दूतावासावर हल्ला
एप्रिलच्या सुरुवातीला दमिश्क येथे इराणच्या दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. यात क्रांतिकारी गार्डचे सात अधिकारी, दोन जनरल यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर 13 एप्रिलला इराणी सैन्याने इस्रायलवर ड्रोन आणि मिसाइल हल्ला केला होता. पण अमेरिकेच्या मदतीने इस्रायलने हा हल्ला हाणून पाडला. इस्रायलच फार नुकसान झालं नाही.